लेह । आज संपूर्ण देशाचील जनता आपल्यापुढे म्हणजेच आपल्या देशाच्या सैनिकांपुढे आदरपूर्वक नतमस्तक होत नमन करत आहेत. आज प्रत्येक भारतीयाची छाती तुमचे शौर्य आणि पराक्रमामुळे फुगलेली आहे. असे सांगतानाच विस्तारवादाचे युग संपले असून आता विकासवादाचे युग आले आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला इशारा दिला आहे. पंतप्रधान मोदी लडाख दौऱ्यावर असून त्यांनी लेहमधील नीमू येथे जवानांना संबोधित केले.
मागील दोन महिन्यांपासून लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यातच जूनमध्ये चीनच्या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर परिस्थिती आणखी तणावग्रस्त झाली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी लडाखमध्ये अचानक भेट देत जवानांशी संवाद साधला.
PM in Ladakh: Age of expansionism is over, this is the age of development
Read @ANI Story | https://t.co/AeNC6nutxP pic.twitter.com/He8C7mxrOo
— ANI Digital (@ani_digital) July 3, 2020
यावेळी मोदी सैनिकांना उद्देशून म्हणाले कि, ‘आज संपूर्ण देशाचील जनता आपल्यापुढे म्हणजेच आपल्या देशाच्या सैनिकांपुढे आदरपूर्वक नतमस्तक होत नमन करत आहेत. आज प्रत्येक भारतीयाची छाती तुमचे शौर्य आणि पराक्रमामुळे फुगलेली आहे. १४ कोअरच्या शौर्याचे किस्से सगळीकडे पसरले आहेत. संपूर्ण जगाने तुमचे अदम्य साहस पाहिले आहे. आपल्या शौर्यगाथा घराघरात दुमदुमत आहे. भारताच्या शत्रूंनी तुमची आगही पाहिली आहे आणि तुमचा रागही पाहिलेला आहे.’
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”