PM Kisan : तुम्हालाही यावेळी 2000 रूपये हवे असतील तर ‘या’ अटी त्वरीत पूर्ण करा

PM Kisan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पंतप्रधान किसान सन्मान निधीचा (Pm Kisan Samman nidhi Scheme) 8 वा हप्ता लवकरच केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना ट्रान्सफर करण्यात येणार आहे. या योजनेत वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. जी तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. सरकारने आतापर्यंत 7 हप्त्यांमध्ये 14000 कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. तुम्हालाही जर सरकारच्या या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला यासाठीच्या काही अटी पूर्ण कराव्या लागतील तरच तुम्ही याचा लाभ घेऊ शकाल –

पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या या योजनेचा लाभ केवळ त्यांनाच मिळणार आहे ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे. अलीकडेच सरकारने यासाठीच्या नियमात काही बदल केले आहेत. त्यापूर्वी ज्यांच्याकडे वडिलोपार्जित जमिनी होत्या त्यांनाही या योजनेचा लाभ मिळायचा. शासनाने दिलेल्या अटीनुसार शेतकर्‍याच्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या नावावर जर जमीन असेल तर ती व्यक्ती या योजनेस पात्र ठरणार नाही.

याबरोबरच जी लोकं शेती करतात, परंतु त्यांच्या कडे शेतीयोग्य जमीन नाही, त्यांनाही या पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळणार नाही. याद्वारे जर कोणी इनकम टॅक्स रिटर्न फाइल करत असेल तर त्यालाही पंतप्रधान किसान सन्मान निधीमधून वगळले जाईल. वकील, डॉक्टर, सीए इत्यादी लोकंही या योजनेच्या बाहेर आहेत.

आपण अशा प्रकारे रजिस्ट्रेशन करू शकता
>> तुम्हाला पहिले पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
>> आता Farmers Corner वर जा.
>> येथे तुम्ही ‘New Farmer Registration’ या पर्यायावर क्लिक करा.
>> यानंतर आधार क्रमांक एंटर करावा लागेल.
>> यासह, कॅप्चा कोड एंटर करुन राज्याची निवड करावी लागेल आणि त्यानंतर पुढे प्रक्रिया करावी लागेल.
>> या फॉर्ममध्ये आपल्याला आपली सर्व वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
>> तसेच बँक खात्याचा तपशील आणि शेतीशी संबंधित माहिती भरावी लागेल.
>> यानंतर आपण फॉर्म सबमिट करू शकता.

ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया
या योजनेत रजिस्ट्रेशन करणे अगदी सोपे आहे. आपण घरबसल्या ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. या व्यतिरिक्त आपण पंचायत सचिव किंवा तलाठी किंवा स्थानिक सामान्य सेवा केंद्राद्वारे देखील या योजनेसाठी अर्ज करू शकता. या व्यतिरिक्त आपण या योजनेसाठी स्वतः देखील रजिस्ट्रेशन करू शकता.

रजिस्ट्रेशनच्या वेळी ‘ही’ माहिती द्यावी लागेल
2019 मध्ये सुरू झालेल्या या योजनेत यापूर्वी काही चुका आढळून आल्या, ज्या सुधारण्याचे सरकारने ठरविले आहे. या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नवीन रजिस्ट्रेशन केलेल्या शेतकर्‍यांना आता अर्जात त्यांचा भूखंड क्रमांक नमूद करावा लागेल. तथापि, नवीन नियमांचा योजनेशी संबंधित जुन्या लाभार्थींवर परिणाम होणार नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.