PM Kisan च्या e-KYC ची शेवटची तारीख पुन्हा वाढवण्यात आली, अशा प्रकारे पूर्ण करा प्रक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan : शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकार कडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. याअंतर्गत 10 कोटींहून जास्त शेतकऱ्यांना 21,000 कोटींहून अधिक रुपयांची मदत जाहीर केली. हे लक्षात घ्या कि, या महिन्याच्या सुरुवातीलाच या योजनेचा 11 वा हप्ता जारी करण्यात आला होता.

What is PM-Kisan Samman Nidhi Yojana? Check Registration Process,  Eligibility, Documents Required, Toll-free Number and More

मात्र, जर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेत असाल तर लक्षात ठेवा की त्याचा 12 वा हप्ता मिळविण्यासाठी तुम्हाला तुमचे ई-केवायसी पूर्ण करावे लागेल. जर आपण शेवटच्या तारखेपर्यंत ई-केवायसी केले नाही तर पीएम किसान योजनेचा 12वा हप्ता मिळणार नाही. याआधी ई-केवायसी पूर्ण करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 होती. आता ही अंतिम मुदत वाढवून 31 जुलै 2022 करण्यात आली आहे. PM Kisan

PM Kisan Status Check 2022 @ pmkisan.gov.in Beneficiary & Installment

पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये ट्रान्सफर केली जाते. जर आपण या योजनेचा लाभ घेत असाल तर ई-केवायसी अंतिम मुदतीपर्यंत करावे लागेल. मात्र असे न केल्यास तुमचे पैसे अडकतील. PM Kisan

अशा प्रकारे लिस्ट मध्ये नाव आहे कि नाही ते पहा

पीएम किसान योजनेचा लाभ घेणारे शेतकरी पीएम किसान https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपली नावे तपासू शकतात. ही वेबसाइट उघडल्यावर फार्मर्स कॉर्नरचा पर्याय दिसेल. यानंतर लाभार्थी लिस्ट च्या पर्यायावर एक नवीन पेज उघडेल. या नवीन पेजवर, तुमचे राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गावाचे डिटेल्स एंटर करा. त्यानंतर गेट रिपोर्टवर जा. येथे तुम्हाला सर्व शेतकऱ्यांची लिस्ट मिळेल. येथे आपले नाव तपासू शकता PM Kisan

PM-KISAN EKYC Process: Steps To Do By Using Aadhar Card – Here's Direct  Links For Registration

अशा प्रकारे ऑनलाइन अपडेट करा

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
उजवीकडे उपलब्ध असलेल्या e-KYC पर्यायावर क्लिक करा-
आधार कार्ड क्रमांक, कॅप्चा कोड एंटर करा आणि सर्च वर क्लिक करा-
आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका.
आता Get OTP वर क्लिक करून मिळालेला OTP टाका.
आता KYC अपडेट केले जाईल.

हे पण वाचा :

Gold Price Today : सोन्यामध्ये घसरण तर चांदी तेजीत, नवीन दर तपासा

PNB ग्राहकांना आता चेक पेमेंटच्या एक दिवस आधी बँकेला द्यावी लागणार माहिती !!!

EPF खात्यातील रजिस्टर्ड मोबाईल नंबर अशा प्रकारे घर बसल्या बदला !!!

Stock Market : टाटा ग्रुपचा ‘हा’ शेअर वर्षभरात गाठणार विक्रमी उच्चांक !!!

PF Account : आता घरबसल्या अशा प्रकारे जनरेट करा UAN नंबर !!!

 

Leave a Comment