हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan सन्मान निधीच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकार कडून नुकतेच ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. हे लक्षात घ्या की, ई-केवायसी न करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. यापूर्वी त्याची अंतिम तारीख 31 मे होती मात्र आता ती वाढवण्यात आली आहे.
PM Kisan च्या अधिकृत वेबसाइटवर याबाबतची माहिती देण्यात आली आहे. यावेळी ई-केवायसी न केल्यामुळे ज्या शेतकऱ्यांना 11 वा हप्ता मिळालेला नाही ते आता पुढील हप्ता घेण्यासाठी ई-केवायसी करू शकतात. मंगळवार, 31 मे रोजी देशातील सुमारे 10 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये या योजनेचा 11 वा हप्ता ट्रान्सफर केला गेला.
अशा प्रकारे करा ई-केवायसी
शेतकरी त्यांचे केवायसी मोबाईल ऍपद्वारे किंवा PM Kisan च्या वेबसाइटवर पूर्ण करू शकतात. यासाठी तुम्ही किसान पोर्टलवर जा. येथे तुम्हाला शेतकरी कोपर्यात eKYC ची लिंक दिसेल. या लिंकवर क्लिक केल्यावर आधार क्रमांक विचारला जाईल. येथे आधार क्रमांक आणि इमेज कोड टाका आणि सर्च बटण दाबा. त्यानंतर आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका. आता मोबाईलवर OTP येईल. तो दिलेल्या जागेत भरा. आता ई-केवायसी पूर्ण होईल. जर यामध्ये कोणतीही अडचण आली तर आधार सेवा केंद्राशी संपर्क साधा.
रेशन कार्ड देखील अपडेट करा
या योजनेत नोंदणी करण्यासाठीचे नियम देखील बदलले आहेत. आता शेतकऱ्यांना नोंदणी केल्यानंतर जमिनीची कागदपत्रे, बँक पासबुक, रेशनकार्ड, आधार कार्ड आणि डिक्लेरेशनची हार्ड कॉपी कृषी विभागाच्या कार्यालयात जमा करावी लागणार नाही. आता या सर्व पेपर्सची पीडीएफ पीएम किसान पोर्टलवर अपलोड करावी लागेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://pmkisan.gov.in/
हे पण वाचा :
PM KISAN : 11 व्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत ??? यामागील कारणे जाणून घ्या
PM Kisan मध्ये आता ‘या’ कागदपत्राशिवाय नाही करता येणार रजिस्ट्रेशन !!!
Multibagger stock : अवघ्या काही महिन्यांत ‘या’ 5 पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना दिला 2700% रिटर्न !!!
Gold Price : सोन्याच्या स्पॉट किंमतीत घट, सोन्यामध्ये गुंतवणूक कशी करावी हे समजून घ्या
Bank FD : जास्त व्याज मिळवण्यासाठी पालकांच्या नावाने सुरु करा FD !!!