नवी दिल्ली । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रांसफर केला आहे. परंतु अजूनही असे अनेक शेतकरी आहेत ज्यांचे पैसे अद्याप खात्यात आलेले नाहीत. याखेरीज असे अनेकही शेतकरी आहेत जे अपात्र आहेत आणि त्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या पात्रता नसलेल्या शेतकर्यांवर आता सरकारने कंबर कसणे सुरू केले आहे.
जर तुम्ही देखील पंतप्रधान किसानचे पैसे चुकीच्या पद्धतीने घेतले असतील तर ते तुम्हाला परत करावे लागेल. तामिळनाडू, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि हिमाचल प्रदेशामधील त्या शेतकऱ्यांकडूनही सरकारने पैसे वसूल केले आहेत ज्यांनी पैसे चुकीच्या पद्धतीने घेतले आहेत. जर आपणही अशा शेतकऱ्यांच्या लिस्ट मध्ये आला आहात की नाही ते जाणून घ्या.
कोणत्या शेतकर्यांकडून पैसे घेतले जातील ते जाणून घ्या
1. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावे शेत जमीन असावी. एखादा शेतकरी शेती करीत असेल पण शेत त्याच्या नावे नसेल तर तो लाभार्थी होणार नाही. शेता आपल्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या नावावर असली तरीही तो या पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
2. जर कुणी शेतजमिनीचा मालक असेल, परंतु तो शासकीय कर्मचारी असेल किंवा रिटायर झाला असेल तसेच तो सभापती किंवा माजी खासदार, आमदार, मंत्री असेल तर त्यालाही या पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. प्रोफेशनल रजिस्टर्ड डॉक्टर, इंजिनियर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
3. 10000 पेक्षा जास्त पेंशन मिळणाऱ्यांनाही लाभ मिळणार नाही. जर एखादी व्यक्ती शेताचा मालक असेल परंतु त्याला महिन्याला दहा हजार रुपयांपेक्षा अधिक पेन्शन मिळात असेल तरीही तो या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. इन्कम टॅक्स भरणाऱ्या कुटुंबियांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
अशाप्रकारे आपल्या हफ्त्याच्या स्टेट्सबद्दल आपण जाणून घेऊ शकता
वेबसाइटवर पोहोचल्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या Farmers Corner वर क्लिक करा. या नंतर Beneficiary Status पर्याया वर क्लिक करा, त्यानंतर एक नवीन पेज उघडेल. आता आपला आधार क्रमांक, मोबाइल नंबर एंटर करा. यानंतर आपल्याला आपल्या स्टेट्स बद्दल पूर्ण माहिती मिळेल. आपण पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी घरबसल्या रजिस्ट्रेशन करू शकता. यासाठी आपल्याकडे आपल्या शेताचा सात बारा, आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि बँक खाते क्रमांक असणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर http://pmkisan.nic.inजाऊन रजिस्ट्रेशन करू शकता.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा