Pm Kisan Samman Nidhi: ‘या’ लोकांना नाही मिळणार पैसे; तुम्ही पात्र आहात का ??

pm kisan samman nidhi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान किसान सन्मान (Pm Kisan Samman Nidhi) निधी योजना ही केंद्रातील मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरकारकडून दर ४ महिन्यांनी आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच गरीब आणि गरजू लोकांनाच याचा फायदा होण्यासाठी केंद्र सरकारने काही नियम आणि कायदेही केले आहेत.

पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या (Pm Kisan Samman Nidhi) माध्यमातून ३ हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना मदत केली जाते. दर ४ महिन्याला २ हजार रुपये याप्रमाणे एका वर्षात ६ हजार रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. या योजनेचा उद्देश लहान शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत देणे हा आहे.

या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी शासनाकडून संपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत. यानुसार, ज्या जमीनधारक शेतकरी कुटुंबाकडे 2 हेक्टरपर्यंत शेती करण्यायोग्य जमीन आहे आणि त्यांची नावे राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या भूमी अभिलेखात आहेत, ते शेतकरी यासाठी पात्र आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की अशी अनेक शेतकरी कुटुंबे आहेत जी पीएम किसान अंतर्गत वार्षिक 6,000 रुपये घेण्यास पात्र नाहीत.

या लोकांना नाही मिळणार पैसे- (Pm Kisan Samman Nidhi) 

सरकारी नियमानुसार, ज्यांच्याकडे २ हेक्टरपेक्षा जास्त शेतीयोग्य जमीन आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. याशिवाय, केंद्र/राज्य सरकारची मंत्रालये/कार्यालये/विभाग आणि केंद्र किंवा राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि संलग्न कार्यालये/स्वायत्त संस्थांचे सेवारत किंवा सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे नियमित कर्मचारी या योजनेचा (Pm Kisan Samman Nidhi) लाभ घेतात ते सुद्धा या योजनेद्वारे आर्थिक लाभ घेण्यास पात्र नसतील. निवृत्त निवृत्तीवेतनधारक ज्यांचे मासिक पेन्शन 10,000 रुपयांपेक्षा जास्त आहे ते देखील योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. (मात्र, मल्टी टास्किंग कर्मचारी, गट-4 आणि गट-डी कर्मचाऱ्यांना या कॅटेगरी तुन बाहेर ठेवण्यात आले आहे.

हे पण वाचा : 

UPI द्वारे ATM मधून पैसे काढण्यासाठी पैसे द्यावे लागणार का ??? RBI ने स्पष्ट केले कि

ITR भरताना करू नका या 5 चुका !!! अन्यथा होऊ शकेल नुकसान

फक्त 10 हजारात सुरु करा हा व्यवसाय; होईल बंपर कमाई

Bank FD : आता या बँकेच्या FD वर मिळणार जास्त व्याज, नवे दर तपासा

आता PAN-Aadhaar Link करण्यास द्यावा लागणार दुप्पट दंड, त्यासाठीची प्रक्रिया तपासा