शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास काही तास शिल्लक ; ‘अशा’ प्रकारे करा चेक

0
49
pm kisan samman nidhi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्वकांक्षी योजना असलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Scheme) सातवा हप्ता आज शेतक-यांच्या खात्यात जमा होणार आहे. मोदी सरकार पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Scheme) सातव्या हप्त्याद्वारे 2 हजार रुपये आज 9 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात येत्या काही तासांतच वर्ग करणार आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्षाकाठी 2000 रुपयांच्या स्वरूपात तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये थेट जमा केले जातात. आपण या योजनेचे लाभार्थी असल्यास आपण घरी बसून खात्यातील रक्कम आली की नाही तपासू शकता.

शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला 6 हजार जमा होतात

पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेंतर्गत वर्षाला तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत शेतक-यांना सहा हप्ते पाठवण्यात आले आहेत. गेल्या 23 महिन्यांत केंद्र सरकारने 11.17 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यावर 95 कोटी रुपयांहून अधिक मदत जमा केली आहे. सातव्या हप्त्याचा लाभसुद्धा 11.17 कोटी नोंदणीकृत शेतकर्‍यांना मिळणार आहे. मात्र, त्यांची कागदपत्रे बरोबर असणं आवश्यक आहे. जेणेकरून पैसे मिळण्यास कोणतीही अडचण उद्भवणार नाही. रेकॉर्डमध्ये काही गडबड असल्यास आपल्याला योजनेचा लाभ मिळणार नाही.

अशा प्रकारे तपासा आपल्या खात्यात पैसे आले का??

पीएम किसान सम्मान निधी अंतर्गत आपल्या बँक खात्यात पैसे आले का हे तुम्ही सहजपणे तपासू शकता
तुम्हाला सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील….

सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा.

तिथे गेल्यावर तम्हाला पीएम किसान सम्मान निधीचं होमपेज दिसेल.

होमपेजवर किसान कॉर्नवर जा.

तिथे स्टेटसच्या पर्यायावर क्लिक करा

त्यानंतर तिथे दिलेल्या रकान्यात अकाऊंट नंबर, आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका.

त्यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती स्क्रिनवर वाचायला मिळेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here