24 फेब्रुवारीला मिळेल PM Kisan योजनेचा हप्ता; तत्पूर्वी 2 मिनिटात करा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण

0
1
PM Kisan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

PM Kisan| देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) योजनेचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी रोजी वितरित केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये आयोजित शेतकरी कार्यक्रमात 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 2,000 रुपये जमा करणार आहेत. परंतु त्यापूर्वी हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे.

ई-केवायसी न केल्यास हप्ता मिळणार नाही!

महत्वाचे म्हणजे, 18 व्या हप्त्यावेळी ई-केवायसी प्रक्रिया न केल्यामुळे आणि अर्जातील त्रुटीमुळे अनेक शेतकरी हप्त्यापासून वंचित राहिले होते. त्यामुळे या वेळी शेतकऱ्यांनी ई-केवायसी वेळेत पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी (PM Kisan) अद्याप ही प्रक्रिया केलेली नाही, त्यांनी मोबाईलद्वारे अवघ्या 2 मिनिटांत ई-केवायसी प्रकिया पूर्ण करावी.

घरबसल्या मोबाईलवर ई-केवायसी कशी करावी?

ई-केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. PMKISAN GoI अॅप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून खालीलप्रमाणे प्रक्रिया पूर्ण करता येईल:

  1. प्रथम अॅप उघडा आणि “कृषक (शेतकरी)” पर्याय निवडा
  2. लॉगिन करून “e-KYC” पर्यायावर क्लिक करा
  3. आधार क्रमांक टाका आणि सबमिट करा
  4. फोन कॅमेरा वापरून चेहरा स्कॅन करा आणि फोटो अपलोड करा
  5. ‘इमेज यशस्वीरित्या कॅप्चर केली’ हा संदेश स्क्रीनवर दिसेल
  6. 24 तासांनंतर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल आणि स्थिती “होय” दिसू लागेल

शेतकरी ओळखपत्र

अधिक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता यावा म्हणून केंद्र सरकारने शेतकरी ओळखपत्र (Farmer ID Card) प्रकल्प हाती घेतला आहे. त्यामुळे भविष्यात वारंवार ई-केवायसी करण्याची गरज भासणार नाही. अनेक राज्यांमध्ये ही प्रक्रिया सुरू आहे. सध्या मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र हे राज्य सर्वाधिक शेतकरी(PM Kisan) ओळखपत्रे तयार करत आहेत