PM Kisan Yojana | आपल्या देशातील जवळपास 70 टक्के लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे केंद्र सरकार देखील सर्वसामान्य जनतेसाठी त्याचप्रमाणे शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणत असतात. शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा म्हणून सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. ही देशातील सर्वात लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांचा आर्थिक लाभ मिळतो. 28 फेब्रुवारी 2024 रोजी या योजनेचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे. आता शेतकरी पीएम किसान (PM Kisan Yojana) योजना 17 वा हप्ता कधी मिळेल याची वाट पाहत आहेत आता या हप्ताबद्दल सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत.
पंतप्रधान किसान सन्मान (PM Kisan Yojana)योजनेच्या 17 व्या हप्त्याची वाट पाहत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. कारण आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हजार रुपये जमा होणार आहे. सरकारमार्फत दरवर्षी 6 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात. हे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. दर चार महिन्यांनी 2 – 2 हजाराच्या हप्त्यांनी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात.
या दिवशी जमा होणार पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता
लवकरच शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा 17 वा हप्ता मिळणार आहे. यावेळी सुमारे नऊ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता सगळे शेतकरी हा हप्ता कधी जमा होईल याची वाट पाहत आहे. तर जून किंवा जुलै महिन्यामध्ये पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
ही कामे करा पूर्ण | PM Kisan Yojana
पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांना काही कामे पूर्ण करावी लागतील. शेतकऱ्यांना ईकेवायसी करावे लागेल. ज्या शेतकऱ्यांनी ईकेवायसी पूर्ण केलेले नसेल, त्या शेतकऱ्यांच्या खात्यात 17 व्या हप्त्याचे पैसे येणार नाही. त्याचप्रमाणे तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक नसेल, तर ते लवकरात लवकर लिंक करून घ्या. ही सगळी कामे झालेली असेल तरच तुम्हाला पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता मिळणार आहे.