नवी दिल्ली । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी 6 हजार रुपये देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करते. शेतकऱ्यांच्या खात्यात दर 4 महिन्यांनी 2 हजार रुपये जमा होतात. आतापर्यंत या योजनेचे 10 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले आहेत. त्याचवेळी, या योजनेच्या 11व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. माहितीनुसार, एप्रिल महिन्यात पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता कोणत्याही तारखेला येऊ शकतो.
जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल. यासोबतच तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करावे, अशीही अट आहे. रजिस्ट्रेशनसाठी, शेतकऱ्यांना त्यांच्या रेशन कार्डचे डिटेल्स अपलोड करावे लागतील आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी जमा कराव्या लागतील.
ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया
या योजनेत रजिस्ट्रेशन करणे अगदी सोपे आहे. आता ही प्रक्रिया तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पूर्ण करू शकता. याशिवाय तुम्ही या योजनेसाठी पंचायत सचिव किंवा तलाठी किंवा स्थानिक कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे अर्ज करू शकता. याशिवाय तुम्ही या योजनेसाठी स्वतः देखील रजिस्ट्रेशन करू शकता.
अशाप्रकारे करता येईल रजिस्ट्रेशन
>> तुम्हाला सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
>> आता Farmers Corner वर जा.
>> येथे तुम्हाला ‘New Farmer Registration’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
>> यानंतर तुम्हाला आधार नंबर टाकावा लागेल.
>> यासोबतच कॅप्चा कोड टाकून राज्य निवडावे लागेल आणि त्यानंतर ही प्रक्रिया पुढे करावी लागेल.
>> या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
>> यासोबतच बँक खात्याचा तपशील आणि शेतीशी संबंधित माहिती भरावी लागणार आहे.
>> त्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.