PM Kisan Yojana : दुसऱ्याच्या शेतात काम करून पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकता का?

PM Kisan Yojana
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात पाठवली जाते. या अंतर्गत प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. जे शेतकरी नोंदणीकृत जमिनीवर शेती करत आहेत तेच पीएम किसान योजने अंतर्गत अर्ज करू शकतात. यासोबतच उत्पन्नाबाबतची माहिती देणारा टॅक्स भरणारे शेतकरी ह्या योजनेत अर्ज करू शकत नाहीत. खरे तर या योजनेचा लाभ घेण्याबाबत लोकांच्या मनात अजूनही अनेक संभ्रम आहेत.

दुसऱ्याच्या जमिनीवर शेती करणाऱ्यांना लाभ मिळणार का?

जर एखाद्या शेतकऱ्याने शेती केली असेल आणि ती शेती त्याच्या पालकांच्या नावावर नोंदवली असेल, तर अशा परिस्थितीत त्याला या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमिनीची नोंद आहे, अशा शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल. याशिवाय, जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांकडून मिळालेली जमीन तुमच्या नावावर नोंदणीकृत असेल, तर या योजनेचा लाभ घेता येईल. देशात असे अनेक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही आणि ते दुसऱ्याच्या जमिनीवर शेती करतात. अशा परिस्थितीत त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही.

PM Kisan Yojana चा लाभ घेण्यासाठी आजच हे काम करा –

PM Kisan Yojana चा लाभ घेण्यासाठी आजच तुमच्या मोबाईल मध्ये Hello Krushi हे मोबाईल अँप डाउनलोड करा. अँप ओपन करताच त्यामध्ये तुम्हाला कृषी योज हा विभाग दिसेल. त्यावर क्लीक करताच शेतीशी निगडित सर्व योजनांना एका क्लीक वर अर्ज करून तुम्ही त्याचा आर्थिक लाभ घेऊ शकता. महत्त्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला १ रुपयाही खर्च करावा लागत नाही. त्यामुळे आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे डाउनलोड करा.

हॅलो कृषी डाउनलोड करण्यासाठी Click Here

वडिलोपार्जित जमिनीवरही लाभ मिळणार नाही

जर एखाद्या शेतकऱ्याची जमीन त्याच्या वाडवडिलांच्या किंवा आई-वडिलांच्या नावावर असेल, तर अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे पीएम किसान योजेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या नावावर जमीन असणं आवश्यक आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर आतापर्यंत 13 हप्ते पाठवण्यात आले असून आता हे शेतकरी 14व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा हप्ता 26 ते 31 मे दरम्यान कधीही त्यांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो.