हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिकमध्ये खासगी बसचा भीषण अपघात होऊन बसला आग लागल्याची दुर्घटना घडली. या आगीत तब्बल 10 ते 12 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हळहळ व्यक्त केली आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान निधीतून २ लाखांची मदतही त्यांनी जाहीर केली आहे.
मोदींनी ट्विट करत म्हंटल, नाशिकमधील बस दुर्घटनेने मी दुःखी आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी लवकरात लवकर बरे होवोत. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे असे मोदींनी म्हंटल. तसेच या आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना केंद्राकडून प्रत्येकी 2 लाखांची मदत आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे अशी माहिती मोदींनी दिली.
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each of the deceased due to the bus fire in Nashik. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 8, 2022
राज्य सरकारकडून ५ लाखांची मदत जाहीर
दरम्यान, या दुर्दवी घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखाची मदत जाहीर केली आहे. जखमींवरचा उपचाराचा खर्च सरकारकडून करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितलं. नाशिक बस अपघाताची सखोल चौकशी केली जाईल. चौकशीअंती दोषींवर कारवाईही करु असं शिंदे म्हणाले.
या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने तातडीचे वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दिले आहेत. नाशिक येथे झालेल्या या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 8, 2022
अपघात कसा झाला-
नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या ठिकाणी हा भीषण अपघात झाला. ट्रक आणि बसच्या या अपघातानंतर बसने जागीच पेट घेतला. यामध्ये १० ते १२ जणांचा होरपळून मृत्यू झाला तर ४० जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांचं पथक दाखल झालं आहे. यवतमाळ येथून बस मुंबईकडे जात असताना सदर अपघात घडल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले