पुणे नाशिक महामार्गावर पिकअप गाडीची दुचाकीस्वाराला धडक, घटना CCTV मध्ये कैद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – आजकाल लोकांना मृत्यू कसा, कुठं, कधी येईल याचा काही नेम नाही. त्यामुळे लोकांनी सावधिगिरी बाळगली पाहिजे. विशेषतः रोडवर गाडी चालवताना हि सावधगिरी बाळगणे खूप गरजेचे आहे. अशीच एक अपघाताची (accident)  घटना नाशिक महामार्गावर घडली आहे. हि संपूर्ण अपघाताची (accident) घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हि घटना पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

काय आहे नेमके प्रकरण?
पुणे नाशिक महामार्गावर चाकण आंबेठाण चौकात महामार्गालगत एक तरुण आपल्या दुचाकीसह उभा होता. मात्र थोड्या वेळाने आपल्यासोबत काय घडेल याची जरासुद्धा कल्पना त्याला नव्हती. दुचाकीवर उभा असलेल्या या तरुणाला पिकअप मालवाहू गाडीने मागून येऊन धडक दिली. हि धडक (accident) एवढी भीषण होती कि हा तरुण फुटबॉल उडावा असा उडून बाजूला पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.संतोष पाचरणे असे या अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

नाशिकमध्ये खाजगी बसने घेतला पेट
औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस आणि टँकर यांच्यात शनिवारी पहाटे 5 वाजून 15 मिनिटाच्या सुमारास एक भीषण अपघात (accident) झाला.या अपघातानंतर चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने जागीच पेट घेतला. दुर्दैवाने या आगीत बसमधील जवळपास दहा प्रवासी जळून खाक झाले आहेत. हि बस यवतमाळ येथून मुंबईकडे जात असताना हा अपघात (accident) झाला.

हे पण वाचा :
DJ च्या गाडीवर अचानक पसरला करंट; नाचता नाचता तरुणांची झाली भयंकर अवस्था
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात; शिवशाही बस पलटी होऊन खड्ड्यात
Jasprit Bumrah आशिया चषक स्पर्धेला मुकणार ? समोर आलं ‘हे’ मोठं कारण
सपाच्या जिल्हा अध्यक्षांच्या गाडीला अपघात थोडक्यात बचावले, थरारक Video आला समोर
भाजप प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलारांच्या नावाची चर्चा?? तर चंद्रकांत पाटलांना…