आंबेडकरांना भारतरत्न देण्यास काँग्रेस तयार नव्हती, तो भाजपने दिला; पंतप्रधान मोदींची टीका

Narendra Modi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राज्यसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर दिले. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. इतकेच नव्हे तर, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांना भारतरत्न देण्यासाठी काँग्रेस कधीच तयार नव्हती, परंतु तो भाजपने दिला” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच त्यांनी माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांना देखील पुन्हा एकदा टार्गेट केले.

आजच्या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख केला. नरेंद्र मोदी म्हणाले की, “काँग्रेस पक्षाला आंबेडकरांना कधीच भारतरत्न द्यायचा नव्हता. परंतु पुढे जाऊन भाजपच्या समर्थकांची सरकार बनल्यानंतर तो देण्यात आला. काँग्रेसने बाबासाहेबांचे विचार संपवण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. त्यांनी याबाबत निवडणुकांमध्ये वक्तव्य केली. ती आजही उपलब्ध आहेत”

तसेच, “SC, ST आणि ओबीसींना मोठी भागिदारी देण्यामध्ये काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कायमच अडचणीचं होतं. जर बाबासाहेब आंबेडकर नसते तर ST SC ला आरक्षण मिळाले असते की नाही याबाबत मला शंका वाटते. देशात पहिल्यांदाच एका पक्षाने आदिवासी समाजाच्या महिलेला राष्ट्रपती केले. काँग्रेसचा निषेध वैचारिक नव्हता, त्यांचा निषेध आदिवासी महिलेच्या विरोधात होता” अशी टीका देखील नरेंद्र मोदींनी केली.

दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. त्याचबरोबर, “काँग्रेस विचार करण्याच्या ही पलिककडे आउटडेटेड झाली आहे. त्यामुळेच येत्या 2024 लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 40 जागासुद्धा पार करणार नाही.” असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. त्यामुळेच आता नरेंद्र मोदी यांच्या टीकेवर काँग्रेसकडून काय प्रत्युत्तर देण्यात येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.