पंतप्रधान मोदींच्या शिरपेचात मानाचा तुरा; भूतानच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भूतानने देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव केला आहे. भूतानने देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘नगादा पेल गी खोर्लो’ने पंतप्रधान मोदींचा सन्मान केला आहे. भूतानचे राजे आणि देशाचे शासक जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे.

भूतानच्या पंतप्रधान कार्यालयाकडून या संदर्भात ट्विट करत घोषणा करण्यात आली आहे. भूतान पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे की, ”भूतानच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्याची घोषणा करताना आम्हांला अतिशय आनंद होतं आहे. कोरोना महामारीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानसाठी जे सहकार्य आणि पाठिंबा दिला ते अतुलनीय आहे. पंतप्रधान मोदी या पुरस्काराचे मानकरी आहेत. भूतानवासियांकडून मोदी यांनी खूप खूप शुभेच्छा.’

दरम्यान, कोरोनासारख्या जागतिक संकटात भारताने भूतानला हरतऱ्हेची मदत केली. तसेच इतर मुद्द्यांवरून देखील भारताची भूतान ला साथ मिळाली आहे. त्यामुळेच भारताचे मैत्रीपूर्ण संबंध आणि सहाकार्य या आधारे हा पुरस्कार देण्यात आला असून तो स्वीकारण्यासाठी नरेंद्र मोदी यांना भूतानमध्ये येण्याचे जाहीर आमंत्रण दिले आहे.

Leave a Comment