देशाला मिळाली पहिली RRTS ट्रेन; पंतप्रधान मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो  महाराष्ट्र ऑनलाईन | देशामधील पहिला सेमी हायस्पीड प्रादेशिक रेल्वेच्या (RRTS Train) दिल्ली-गाझियाबाद- मेरठ कॉरिडॉरच्या 17 km मार्गाचे उदघाटन देशाचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते आज म्हणजेच 20 ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे राज्यपाल आनंदीबेन पटेल, केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी आदी मान्यवर उपस्थित होते. या रेल्वेला “नमो  भारत ट्रेन” असे नवीन नामकरण करण्यात आले आहे.

नवीन सुरु करण्यात आलेल्या RRTS च्या मार्गामुळे दिल्ली कॅपिटल  क्षेत्रातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यात मोठी मदत मिळणार आहे. हा संपूर्ण दिल्ली-गाझियाबाद- मेरठ कॉरिडॉर 82.15 km असून त्यातील साहिबाबाद ते दुहाई डेपो हा 17 km चा  मार्ग सुरु करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने साहिबाबाद, गाजियाबाद, गुलधर, दुहाई व दुहाई डेपो या पाच स्थानकांचा समावेश असणार आहे. शनिवारपासून म्हणजेच २१ ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांसाठी ही ट्रेन सेवेसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. RRTS ही नवीन रेल्वे- आधारित सेमी- हाय स्पीड, हाय-फ्रिक्वेंसी कम्युटर ट्रान्झिट सिस्टम आहे.

दर 15 मिनिटांनी उपलब्ध असेल नमो भारत ट्रेन :

“नमो भारत  ट्रेन ” मध्ये एकूण 6 डब्बे असणार आहेत. ज्यामध्ये एक प्रीमियम कोच असेल व उर्वरित स्टॅंडर्ड कोच असणार आहेत. साहिबााबाद ते दुहाई डेपोपर्यंतचे रेल्वे भाडे ५० रुपये ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रीमियम कोचसाठी 100 रुपये द्यावे लागणार आहेत. ही ट्रेन दर 15 मिनिटांनी उपलब्ध असेल, परंतु पुढील स्थानकांचा विस्तार केल्यानंतर ही ट्रेन दर 5 मिनिटांनी चालवली जाईल.