TiK ToKची सुट्टी केल्यानंतर मोदींनी देशातील युवकांना दिलं ‘अ‍ॅप चॅलेन्ज’, म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्रातील मोदी सरकारने TiK ToKसह चीनच्या ५९ अ‍ॅपवर बंदी घातल्यानंतर आता या क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकायला सुरूवात केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत देशातील युवकांना हे चॅलेन्ज दिले आहे. ज्यांच्याकडे आयडिया असतील त्यांनी पुढे यावे असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी ट्विट करत देश आता स्वावलंबी भारत अ‍ॅप इनोव्हेशन चॅलेन्ड लॉन्च करत असल्याचे म्हटले आहे. आज मेड इन इंडिया अ‍ॅप तयार करण्यासाठी तांत्रिक आणि स्टार्ट अप समुदायामध्ये मोठा उत्साह आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे. या मुळे @GoI_MeitY आणि @AIMtoInnovate हे संयुक्तपणे इनोव्हेशन चॅलेंज सुरू करत आहेत असे मोदी यांनी म्हटले आहे.

जर तुमच्याकडे असे एकादे प्रोडक्ट असेल, किंवा तुम्हाला वाटत असेल की आपल्याकडे काही चांगले करण्याचा दृष्टीकोन आणि क्षमता आहे, तर मग तुम्ही टेक कम्युनिटीला नक्कीच जोडले जा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी लिंक्डइनवर आपले हे विचार मांडले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment