नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुजरातमधील गुंतवणूकदारांच्या शिखर परिषदेत भाग घेतला. या शिखर परिषदेत, पीएम मोदींनी राष्ट्रीय ऑटोमोबाईल स्क्रॅपिंग पॉलिसी देखील लॉन्च केली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की,” हि पॉलिसी देशातील अनफिट वाहने वैज्ञानिक पद्धतीने काढण्यात मोठी भूमिका बजावेल.” केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यावेळी उपस्थित होते.
पीएम मोदी म्हणाले की,” जुनी वाहने, जुन्या तंत्रज्ञानामुळे रस्ते अपघाताचा धोका खूप जास्त आहे, ज्यामध्ये दिलासा मिळेल. त्याचबरोबर प्रदूषणामुळे आपल्या आरोग्यावर होणारा परिणाम देखील कमी होईल.”
इस पॉलिसी से सामान्य परिवारों को हर प्रकार से बहुत लाभ होगा।
सबसे पहला लाभ ये होगा कि पुरानी गाड़ी को स्क्रैप करने पर एक सर्टिफिकेट मिलेगा।
ये सर्टिफिकेट जिसके पास होगा उसे नई गाड़ी की खरीद पर रजिस्ट्रेशन के लिए कोई पैसा नहीं देना होगा: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) August 13, 2021
पंतप्रधान मोदींनी पॉलिसीचे फायदे सांगितले
सामान्य कुटुंबांना या पॉलिसीचा हरप्रकारे मोठा फायदा होईल. रस्ते अपघातासारख्या धोक्यांपासून मुक्तता मिळेल हा पहिला फायदा होईल. जुनी वाहने, जुन्या तंत्रज्ञानामुळे रस्ते अपघाताचा धोका खूप जास्त आहे, ज्यामुळे त्यातून सुटका होईल. यासह, या पॉलिसीमुळे प्रदूषण देखील कमी होईल आणि देखभाल खर्च, दुरुस्ती खर्च, जुन्या वाहनाची इंधन कार्यक्षमता देखील वाचवेल.”
नवीन गाडीच्या खरेदीवर रजिस्ट्रेशनसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत
जुनी कार स्क्रॅप केल्यावर एक सर्टिफिकेट दिले जाईल. ज्या व्यक्तीकडे हे सर्टिफिकेट असेल त्याला नवीन गाडीच्या खरेदीवर रजिस्ट्रेशनसाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. ते म्हणाले की,” स्क्रॅपिंग पॉलिसीमधून रॉड टॅक्समधूनही काही प्रमाणात सूट दिली जाईल.”