हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना NDA मध्ये येण्याची खुली ऑफर (PM Modi Offer To Sharad Pawar And Uddhav Thackeray) दिली आहे. येत्या काळात काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं विधान शरद पवारांनी काही दिवसापूर्वी केलं होते. हाच धागा पकडून काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा NDA मध्ये या असं आवाहन मोदींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना केल आहे. नरेंद्र मोदी यांची आज महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारासाठी नंदुरबारमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.
गेल्या 40 ते 50 वर्षांपासून महाराष्ट्राचे एक दिग्गज नेते राजकारणात सक्रीय आहेत. ते सध्या काहीही बोलत आहेत. “बारामतीच्या निवडणुकीनंतर शरद पवार (Sharad Pawar) चिंतेत आहेत. नकली शिवसेना, NCP ने काँग्रेसमध्ये विलीन होण्याच मन त्यांनी बनवलय. परंतु त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा शरद पवारांनी अजित पवारांसोबत यावे आणि उद्धव ठाकरेंनी शिंदेंसोबत यावे, त्यांची सगळी स्वप्न पूर्ण होतील अशी ऑफर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना दिली आहे.
शरद पवार दिले हे उत्तर –
नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ऑफरनंतर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या व्यक्तीचा, पक्षाचा आणि त्यांच्या विचारधारेचा संसदीय लोकशाही पद्धतीवर विश्वास नाही. मग ते सत्ताधारी असतील किंवा इतर… अशा लोकांसोबत असोसिएशन होणार नाही… व्यक्तीगत संबंधाचं सोडा… पण राजकीय संबंध प्रस्थापित करणं हे माझ्याच्यानं कधी होणार नाही, असं म्हणत शरद पवारांनी मोदींची ऑफर धुडकावून लावली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री यांना अटक करून तुरुंगात टाकलं. यामागे केंद्रीय नेतृत्वाचा, केंद्र सरकारचा सहभाग असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. म्हणजेच यातून एक गोष्ट स्पष्ट होतेय की, लोकशाही पद्धतीवर त्यांचा विश्वास नाही असं म्हणत पवारांनी मोदींवर टीका केली.