PM Modi On Congress । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला खुलं आव्हान दिले आहे. काँग्रेस पक्षाचा विचार जुना झाला आहे. काँग्रेस विचार करण्याच्याही पलिककडे आउटडेटेड झाली आहे असं म्हणत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 40 जागासुद्धा पार करणार नाही. असं नरेंद्र मोदी यांनी म्हंटल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर राज्यसभेत चर्चा सुरु आहे यावेळी मोदींनी आपल्या भाषणात जून नवं सर्व काही काढत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
धोरण लकवा ही तर काँग्रेसची ओळख- PM Modi On Congress
नरेंद्र मोदी म्हणाले, धोरण लकवा ही तर काँग्रेसची ओळख झाली होती. मात्र आमचं सरकार तसं नाही. आम्ही खूप मेहनत घेऊन देशाला संकटांमधून बाहेर घेऊन आलो आहोत. त्यामुळे संपूर्ण देश आम्हाला आशीर्वाद देत आहे. काँग्रेस 10 वर्षात देशाला 11 व्या नंबरवर घेऊन आली . आम्ही 10 वर्षात देशाला 5 व्या नंबरवर घेऊन आलो. ही काँग्रेस आम्हाला आर्थिक नीतीवर भाषण ऐकवत आहे. काँग्रेसने नेहमीच इंग्रजांकडून प्रेरणा घेतली असा आरोपही मोदींनी आपल्या भाषणात केला.
मोदी पुढे म्हणाले, ज्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचे संविधान लिहिले त्या आंबेडकरांचे महत्व काँग्रेसने कमी केलं. आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार द्यावा असं काँग्रेसला कधीही वाटलं नाही. आणि ज्यांनी आपल्याच कुटुंबातल्या लोकांना भारतरत्न पुरस्कार दिले असे लोक आम्हाला उपदेश देत आहे. ज्यांनी देशातील रस्त्यांना आपल्या कुटुंबियांच्या नावे दिली, ते आम्हाला सामाजिक न्यायावर भाषण देत आहेत. ज्या काँग्रेसला आपल्या नेत्यांवर कोणतीच गॅरंटी नाही तेच लोक आज मोदी गॅरेंटीवरून टीका करत आहेत असं म्हणत नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर (PM Modi On Congress) हल्लाबोल केला.
यावेळी मोदींनी पंडित नेहरुंच्या धोरणावर सुद्धा निशाणा साधला. नेहरू हे आरक्षणाच्या विरोधात होते असा आरोप मोदींनी केला. यावेळी त्यांनी नेहरूंचा एक पत्रही दाखवलं जे नेहरूंनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पाठवलं होते. या पत्रात त्यांनी म्हंटल होते, आरक्षण मला आवडत नाही, खास करू नोकरीत आरक्षण नकोच असं नेहरू म्हणाले असल्याचा दावा मोदींनी केला.