नवी दिल्ली | नरेंद्र मोदी यांनी आपल्या केबिनमध्ये एका मुलासोबत फोटो काढले आहेत. तो छोटासा मुलगा अत्यंत गोड आहे आणि मोदी त्याला खेळवत आहेत. असा फोटो स्वतः नरेंद्र मोदी यांनी आपल्या इन्स्टा वर पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी लिहले आहे की माझा स्पेशल फेंड आज मला भेटायला आला होता.
https://www.instagram.com/p/B0QPjPLFlUo/?igshid=3n1bqhfurrix
नरेंद्र मोदी संसदेतील केबिनमध्ये बबसले असता त्यांच्या केबिनमध्ये एक बाळ आले ते बाळ एकटे आले नव्हते बरं! त्याचे आजोबा त्याच्या सोबत आले होते. त्याला नरेंद्र मोदींनी आपल्या मांडीवर बसवले. प्रेमाने जोजवले. आणि त्याला चॉकलेट देखील खायला दिले. पण हा मुलगा नेमका कोण आहे. हा सर्व सोशल मीडिया आणि नेटीजनला पडलेला प्रश्न? या प्रश्नावरच आज सोशल मीडियात दिवसभर चर्चा आहे. हा मुलगा कोण आहे? हाच प्रश्न सर्वांना पडला आहे.
नरेंद्र मोदी यांनी ज्या बाळाच्या सोबत फोटो पोस्ट केले आहेत. त्यांचा तो स्पेशल फ्रेंड हा भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार सत्यनारायण जटिया यांचा नातू आहे. त्याला घेऊन त्याचे आजोबा आज मोदींना भेटायला आले होते. तेव्हा हे बाळ मोदींच्या जवळ रमले तेव्हा टिपलेली क्षणचित्रे मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत.




