PM Modi Ram Setu Visit । उद्या २२ जानेवारीला राम मंदिर उदघाटन सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशात आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. तत्पूर्वी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज तामिळनाडू येथील अरिचल मुनई पॉइंटला भेट दिली. असे मानले जाते की भगवान श्रीरामाने आपल्या वानरसेनेच्या मदतीने याच ठिकाणी राम सेतू बांधला होता. या ठिकाणाहुन राम सेतूची सुरुवात झाली होती.
राम सेतू भेटीचं मोठं महत्त्व – PM Modi Ram Setu Visit
पंतप्रधान मोदींनी यावेळी धनुषकोडीलाही भेट दिली आहे जिथे भगवान राम यांनी रावणाचा पराभव करण्याचे व्रत घेतले होते. ही पवित्र माती घेऊनच श्रीराम लंकेला गेले होते. ही माती म्हणजे भारताच्या लवचिकतेचे आणि कोणत्याही आव्हानावर विजय मिळवण्याच्या क्षमतेचे प्रतीक आहे असं मानले जाते. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पंतप्रधान उद्या अयोध्येला जाणार असल्याने या रामसेतू दौऱ्याला (PM Modi Ram Setu Visit) मोठं महत्त्व आहे.
Tamil Nadu: Prime Minister Narendra Modi at Arichal Munai point, which is the place from where Ram Setu starts. pic.twitter.com/Cy86FtwyBB
— ANI (@ANI) January 21, 2024
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी श्री कोठंडाराम स्वामी मंदिरात जाऊन पूजा केली. तसेच त्यांनी अरुल्मिगु रामनाथस्वामी मंदिराला दिलेल्या भेटीचे स्मरण केले. याशिवाय मोदींनी तामिळनाडूच्या रामेश्वरममधील अरुल्मिगु रामनाथस्वामी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मी हे क्षण कधीही विसरणार नाही, या मंदिराच्या प्रत्येक भागात शाश्वत भक्ती आहे. असं म्हणतात कि, या मंदिरात असलेल्या शिवलिंगाची स्थापना प्रभू रामाने केली होती. तसेच राम आणि देवी सीता यांनी येथे प्रार्थना केली होती.