पराभव आणि विजय हे जीवनाचा हिस्सा, आम्हांला खेळाडूंचा अभिमान; हॉकी संघाच्या पराभवानंतर मोदींची प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | टोकियो ऑलिम्पिकमध्ये सेमी फायनलमध्ये भारतीय हॉकी संघाचा बेल्जियम कडून पराभव झाला. अटीतटीच्या या लढाईत भारताचे ऑलिम्पिकमध्ये स्वप्न भंगले. या सामन्यात बेल्जियमने 5-2 असा मोठा विजय मिळविला. दरम्यान भारताच्या या पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत भारतीय खेळाडूंना पाठिंबा दिला.तसेच आम्हांला आमच्या खेळाडूंचा गर्व आहे असेही मोदी म्हणाले.

मोदींनी ट्विट करत म्हंटल की, “पराभव आणि विजय हे जीवनाचा हिस्सा आहे. टोकियो 2020 मध्ये आपल्या पुरुष हॉकी संघानं आपली सर्वश्रेष्ठ खेळी केली आणि हेच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. संघाला पुढचा सामना आणि त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा. भारताला आपल्या खेळाडूंवर गर्व आहे.”

कोट्यावधी भारतीयांप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदीही आज सकाळपासून हा सामना लाइव्ह पाहत होते. मोदींनी सात वाजून ३७ मिनिटांनी एक ट्विट केलं होतं. यामध्ये मोदींनी, “मी भारत विरुद्ध बेल्जियमदरम्यानचा पुरुष हॉकीचा उपांत्य फेरीचा सामना पाहत आहे. मला आपल्या संघाचा आणि त्यांच्या कौशल्याचा अभिमान आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो,” असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाला सेमीफायनल्समध्ये पराभवाचा सामना करावा लागला. सामन्यात भारतानं दोन गोल डागले, तर बेल्जियमनं पाच गोल डागत भारतावर मात केली. त्यामुळे भारताचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले.