हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजपासून देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे देशभरात आनंदाचे वातावरण आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने संयुक्तरित्या निर्माण केलेली ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लस पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना दिल्या जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेशी संवाद साधला आहे.
मोदी म्हणाले, पहिल्या टप्प्यात तीन कोटी नागरिकांना लस दिली जाणार आहे. येत्या टप्प्यात ही संख्या 30 कोटींवर नेण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितले. लसीचे दोन्ही डोस घेणं आवश्यक असून त्यानंतर दोन आठवड्यानंतर शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीमध्ये आवश्यक बदल होतील, असंही नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं.
नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, जनता कर्फ्युचा कोरोनाविरुद्ध लढाईसाठी फायदा झाला. तसेच, टाळ्या, थाळ्या वाजवणे आणि दिवे लावल्यामुळे देशाचा आत्मविश्वास वाढला. या सर्व गोष्टींमुळे कोरोना विरोधात लढण्यासाठी देशाला मानसिक दृष्टीकोनातून तयारी करण्यास मदत झाली, असं मत नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.
जनता कर्फ्यू, कोरोना के विरुद्ध हमारे समाज के संयम और अनुशासन का भी परीक्षण था, जिसमें हर देशवासी सफल हुआ।
जनता कर्फ्यू ने देश को मनोवैज्ञानिक रूप से लॉकडाउन के लिए तैयार किया।
हमने ताली-थाली और दीए जलाकर, देश के आत्मविश्वास को ऊंचा रखा: PM#LargestVaccineDrive
— PMO India (@PMOIndia) January 16, 2021
कोरोना लसीबाबतच्या अपप्रचाराला बळी पडू नका –
दरम्यान, कोरोना लसीच्या गुणवत्तेबाबत वैज्ञानिक आणि तज्ज्ञ दोन्ही आश्वस्त झाल्यानंतरच याच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली. कोरोना लसीबाबत केल्या जाणाऱ्या अप्रचाराला अजिबात बळी पडू नका,अस आवाहन देखील पंतप्रधान मोदींनी केलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’