आंदोलन दिल्लीत, पंतप्रधान मोदी घेणार गुजरातमधील कच्छच्या शेतकऱ्यांची भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदाबाद । विरोधकांच्या विरोधानंतरही संसदेत केंद्राकडून मंजूर करून घेण्यात आलेल्या कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आंदोलनाचा आज २० वा दिवस आहे. दिल्ली आणि दिल्लीच्या सीमेवर कडाकाच्या थंडीत कुडकुडत्या स्थितीत शेतकरी रस्त्यावरच ठाण मांडून बसलाय. मोदी सरकारमधील मंत्री आणि शेतकऱ्यांच्या अनेकदा चर्चा होऊनही त्यातून काहीही मार्ग निघू शकलेला नाही. खुद्द गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतरही आंदोलकांचं समाधान झालेलं नाही. याच दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. इथे ते कच्छमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

गुजरातच्या दौऱ्यात कच्छमधल्या काही शेतकरी संघटना आणि शीख शेतकऱ्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट घेणार आहेत. मोदी धोर्डे इथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भारत-पाकिस्तान सीमेजवळ वसलेल्या शीख शेतकर्‍यांना पंतप्रधान मोदींनी चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आलंय. कच्छ जिल्ह्यातील लखपत तालुक्यात आणि आसपास जवळजळव अंदाजे ५,००० शीख कुटुंबं वसलेली आहेत.

शीख समाज आणि शेतकर्‍यांना संदेश देण्याचा हा पंतप्रधान मोदींचा प्रयत्न असल्याचं या दौऱ्यातून दिसून येतंय. याआधीही पंतप्रधान मोदींनी नव्या कृषी कायद्याच्या फायद्यांविषयी वेगवेगळ्या मंचावरून बर्‍याचदा भाष्य केलंय. ‘मन की बात’ या कार्यक्रमातही शेतकऱ्यांची त्यांनी या कायद्याबद्दल सांगितलं होतं. मात्र, शेतकऱ्यांना मोदी सरकाराच्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास नसून तीन कृषी कायदे मागे घेण्यावर शेतकरी ठाम आहे. केवळ मोठ्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी तीन नवे कृषी कायदे केंद्राने आणले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणं आहे.

तर दुसरीकडे सरकार नव्या कृषी कायद्याच्या फायद्यांविषयी सांगत असताना शेतकऱ्यांच्या आंदोलनावर वारंवार प्रश्नचिन्ह उत्पन्न करत आहेत. त्यांना खलिस्तानी, माओवादी, तुकडे-तुकडे गॅंगचे हस्तक म्हणत आहे. आणि त्यांच्यासोबत चर्चाही करत आहे.

दरम्यान, अवघा पंजाबमधील शीख समाजातील शेतकरीवर्ग आणि इतर राज्यातील शेतकरी दिल्लीत आपल्या मागणीसाठी बसले असताना पंतप्रधान मोदी गुजरातमधील कच्छच्या काही शीख समाजातील शेतकऱ्यांशी भेटून कुठला तोडगा काढू पाहत आहेत? असा प्रश्न सहाजिकच तयार होत आहे.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment