पंतप्रधान मोदी बनले Pilot !! लढाऊ विमान तेजस मधून केलं उड्डाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या दौऱ्यावर असतात. यावेळी मोदींचा दौरा हा बंगळुरुला सुरु आहे. आज मोदींनी बंगळूरूमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीला भेट दिली. यावेळी मोदींनी स्वदेशी तेजस लढाऊ विमानातून उड्डाणं केलं . या उड्डाणानंतर पंतप्रधान मोदींनी आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. त्यांनी म्हंटल, ‘तेजसचे उड्डाण यशस्वीरीत्या पूर्ण केले. हा अनुभव अविश्वसनीय होता. या अनुभवाने आपल्या देशातील स्वदेशी क्षमतांवरील माझा आत्मविश्वास खूप वाढला आहे. यामुळे माझ्यामध्ये आपल्या राष्ट्रीय क्षमतेबद्दल अभिमान आणि आशावाद जागृत झाला आहे.

मोदींनी केली हवाई पाहणी

पंतप्रधान मोदींनी तेजसमधून उड्डाण करताना हवाई पाहणी केली आहे. तसेच बंगळुरु येथील प्लांटला भेट दिली आहे. भारतीय हवाई दलाची लढाऊ विमाने आणि लढाऊ हेकॉप्टर खरेदी करण्याची योजना आहे. तसेच सुखोई-30 श्रेणीतील विमानांमध्ये सुधारणा करण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी काम करत आहे. त्यामुळे वायुसेना आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्यात लवकरच अब्जावधी डॉलर्सचा संभाव्य करार होण्याची शक्यता आहे. यातच आता आज मोदींनी HAL या बंगळूरू येथील प्लांटला भेट दिल्यामुळे याची चर्चा रंगताना दिसून येत आहे. तेजस विमानाचे इंजिन हे भारतातच तयार होणार आहेत. त्यामुळे स्वदेशी या उपक्रमास चालना मिळणार आहे.

स्वदेशी विमाने होणार वायूदलात सामील

महात्मा गांधींनी दिलेला स्वदेशीचा नारा पंतप्रधान मोदींनी सांभाळला. त्यासाठी सुरु केलेल्या स्वदेशी उपक्रमास चालना देत आता भारतीय वायू सेनेसाठी मायदेशात तयार केलेल्या विमानांचा समावेश वायूदलात करण्यात येणार आहे. त्यामधील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर तेजस त्यापैकीचं एक आहे. ज्यातून आज मोदींनी उड्डाण केले. हे फायटर जेट खरेदी करण्यासाठी इतर देशांनीही आपली तयारी दर्शवली आहे.

स्वदेशी HAL फ्रेंच कंपनी सफ्रान कंपनी संयुक्तपणे करणार काम

स्वदेशी HAL फ्रेंच कंपनी सफ्रान सोबत एकत्रित मिळून हेलिकॉप्टर इंजिन डिझाइन आणि विकसित करण्यावर सोबत काम करणार आहेत. तसेच भारतातील हवाई दलास मजबूत करण्यासाठी US फर्म GE Aerospace सोबत देशात फायटर जेट इंजिनच्या संयुक्त उत्पादनासाठीच्या करारावरही चर्चा सुरु आहे. त्यामुळे हवाई दल आहे त्यापेक्षा मजबूत होईल असे म्हणायला हरकत नाही.

नाशिकमध्ये उभारला जाईल नवा प्लांट

स्वदेशी HAL ने सांगितल्याप्रमाणे लढाऊ विमाने आणि मूलभूत प्रशिक्षकांसाठी तसेच IAF च्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी LCA Mk-1A आणि हिंदुस्तान टर्बो ट्रेनर-40 (HTT-40) विमानांच्या निर्मितीसाठी नाशिकमध्ये नवा उत्पादन प्लांट सुरु करण्याची तयारी सुरु आहे. असे सांगण्यात आले आहे.