बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींचे खास Tweet; म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९७ वी जयंती आहे. यानिमित्ताने देशभरातून राजकीय नेतेमंडळी बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा ट्विट करत बाळासाहेबांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे आणि त्यांना अभिवादन केलं आहे.

बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. बाळासाहेबांनी आपले जीवन लोकांच्या कल्याणासाठी वाहून घेतले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या गप्पा आणि चर्चा नेहमी माझ्या स्मरणात राहतील. त्यांना उत्तम ज्ञान आणि वक्तृत्वाची देणगी लाभली होती, असं ट्विट नरेंद्र मोदींनी केलं आहे.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे . बाळासाहेबांनी 55 वर्ष संघर्ष केला. मराठी माणसाला राज्याच्या राजधानीत स्वाभिमानाने, ताठ मानाने जगायला शिकवले. संकटाच्या छाताडावर पाय ठेवून उभं राहा असा कानमंत्र बाळासाहेबांनी दिला. आम्ही त्यांचे ऋणीच आहोत असं संजय राऊत म्हणाले.