दिल्लीकरांनी शांतता आणि एकता राखावी – पंतप्रधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  दिल्लीकरांनी शांतता आणि एकता राखा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले  आहे. दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले की, दिल्लीतील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. पोलीस आणि अन्य यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

शांतता आणि सुसंवाद राखणे ही आपली जबाबदारी आहे. मी दिल्लीच्या माझ्या भावांना आणि बहिणींना आवाहन करतो की, त्यांनी कायम शांतता आणि बंधुता जपावी. दिल्ली शहर शांत रहावं आणि लवकरात लवकर पूर्वपदावर यावं हे जास्त महत्वाचं आहे. असं मोदी म्हणाले.

Capture

दिल्लीतील परिस्थितीवरुन आता राजकारणही सुरु झालं असून काँग्रेस आणि भाजपाने पत्रकार परिषदा घेऊन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. दिल्लीतील परिस्थितीला गृहमंत्री अमित शाह जबाबदार असून त्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारत राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. तर काँग्रेसचीच ही खेळी असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

Leave a Comment