… तेव्हा मोदींनी राणेंना झापलं होतं; ठाकरे गटाचा मोठा गौप्यस्फोट

modi rane
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या सचिवाने अनेकांना गंडा घातला. ही गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी राणे झापलं होते असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut)  यांनी केला. कणकवली येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना विनायक राऊत यांनी राणे कुटुंबियांवर चौफेर टीका केली.

विनायक राऊत म्हणाले, ‘मध्यल्या काळात नारायण राणेंनी एक पीए ठेवला होता. या पीएने अनेकांना गंडा घातला. जेव्हा मोदी साहेबांच्या हे लक्षात आलं. त्यावेळी, या पीएला आधी हाकलून द्या, नाहीतर तुमचं मंत्रिपद काढून घेईन, अशा शब्दांमध्ये राणेंना झापलं होतं, असा खुलासा विनायक राऊत यांनी केला.

राणेंनी सख्या चुलत भावाचे घरासमोर डोकं फोडून, त्याला गाडीत घालून नांदगावला नेऊन जाळून टाकले, असा राणेंचा इतिहास आहे खळबळजनक आरोपही विनायक राऊत यांनी केला. नारायण राणेंच्या कारकिर्दीत जेवढे लोक बेपत्ता झाले, जेवढे खून झाले, या सर्वाची एसआयटी चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.