पंतप्रधान मोदी 1 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर; दगडूशेठ हलवाई गणपतीचे घेणार दर्शन

narendra modi pune
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या 1 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुणे दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी मोदी दगडूशेठ हलवाई गणपतीचे (Dagdusheth Halwai Ganpati ) दर्शन घेऊन पूजा देखील करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने सुरक्षा यंत्रणेचा कडक बंदोबस्त राबविण्यासाठी उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. पुण्यात आल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचं भूमिपूजन सुद्धा करण्यात येईल.

समोर आलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी यांना पुण्यातल्या लोकमान्य टिळक स्मारकचा ‘लोकमान्य टिळक पुरस्कार’ (Lokmanya Tilak Award) जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कार सोहळ्यानिमित्त नरेंद्र मोदी पुण्यात दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचे पुणे प्रशासनाकडून जंगी स्वागत करण्यात येईल. तसेच त्यांच्या सुरक्षिततेची ही विशेष काळजी घेण्यात येईल.मोदी लोहगाव विमानतळावरून शिवाजीनगर भागात हेलिकॉप्टरने दाखल होणार आहेत. तिथून पुढे ते दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जातील. यानंतर दुपारी मोदी स. प. महाविद्यालय येथे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन करण्यात येईल. या सर्व कार्यक्रमानंतर नरेंद्र मोदी दिल्लीसाठी रवाना होतील.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपूर्वी पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दगडूशेठ मंदिराची पाहणी केली आहे. त्यांच्यासोबत महापालिका आयुक्त आणि पुणे पोलीस आयुक्त देखील उपस्थित होते. मंदिराच्या सर्व परिसराची पाहणी केल्यानंतर आयुक्तांकडून नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. महत्वाचे म्हणजे, नरेंद्र मोदींना टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी लोकमान्य टिळक ट्रस्टतर्फे आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे हा पुरस्कार सोहळा पुणेकरांना पाहता यावा यासाठि ट्रस्टतर्फे थेट प्रक्षेपणाची लिंक देण्यात येणार आहे. त्यामुळे या सोहळअयामध्ये पुणेकरांना देखील सहभाग नोंदवता येणार आहे.