मोदी सरकारचा मोठा निर्णय ! 23000 कोटींच्या आपत्कालीन हेल्थ पॅकेजची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय मंत्रिमंडळाचा काल मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. काल रात्री सर्व मंत्र्यांना खातेवाटप जाहीर करण्यात आले. यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. हे निर्णय कोरोना आणि शेतकऱ्यांशी संबंधित आहेत.

यामध्ये कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी २३ हजार १०० कोटी रुपयांच्या आपत्कालीन आरोग्य पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त एक लाख कोटी रुपये मंडयांच्या मार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. कॅबिनेटची बैठक संपल्यानंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, मनसुख मंडाविया आणि नरेंद्र सिंह तोमर यांनी कॅबिनेटमधील निर्णयांची माहिती दिली.

आज संध्याकाळी नव्या मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली. जवळपास तासभर ही बैठक चालली होती. मंडयांचे सशक्तीकरण करणे हा सरकारचा उद्देश आहे. यामुळे १ लाख कोटी रुपये मंडयांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. एपीएमसी मंडया आणखी मजबूत करण्यात येतील. कृषी मंडयांना अधिक संसाधनं देण्यात येतील मंडया संपवल्या जाणार नाहीत, असे कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले आहे.