सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे; पंतप्रधान मोदींचे विठुरायाला साकडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल- रखुमाई यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. आज सकाळी पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली. आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत . सर्वाना उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना मोदींनी विठुरायाला केली.

आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करूया. वारकरी चळवळ ही आपल्या उत्कृष्ट परंपरेचं उदाहरण असून समानता आणि एकता यावर भर देणारी आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटल.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या हस्ते आज विठ्ठल रखुमाईची महापूजा संपन्न झाली. पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पांडुरंगाच्या चरणी घातले.

You might also like