हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (PM Surya Ghar Yojana) केंद्र सरकार कायम देशातील नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असते. ज्यांचा कायम लोकांना फायदा होत आला आहे. असाहतच आता मोदी सरकारने आणखी एका फायदेशीर योजनेला मंजुरी दिल्याचे समजत आहे. नुकतीच मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेला (पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना) मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत देशातील १ कोटींहून अधिक कुटुंबांना मोफत वीज पुरवली जाते आहे.
नुकतीच मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाची गुरुवारी बैठक पार पडली. (PM Surya Ghar Yojana) या बैठकीत पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेला मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याचे समजत आहे. याबाबत स्वतः केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी एका पत्रकार परिषदेत माहिती दिली. या सोलर सबसिडी योजनेअंतर्गत आता देशातील लोकांना ३०० युनिट मोफत वीज मिळणार आहे. त्यामुळे हा निर्णय तमाम भारतीय कुटुंबांसाठी प्रकाशदायी ठरला आहे.
किती खर्च होणार?
गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेला मंजुरी दिल्यानंतर याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी योजनेसाठी लागणाऱ्या खर्चाविषयी भाष्य केले आहे. (PM Surya Ghar Yojana) याबाबत सांगताना ते म्हणाले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीएम सूर्य घर योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत देशातील १ कोटी कुटुंबांच्या घरांवर सौर पॅनेल बसवण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकार एकूण ७५,०२१ कोटी रुपये खर्च करणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात मॉडेल सोलर व्हिलेजदेखील विकसित केले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.
केंद्र सरकारकडून मिळणार अनुदान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ फेब्रुवारी २०२४ रोजी पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेचे उदघाटन केले होते. या योजनेतून लाभार्थ्यांना ३०० युनिट मोफत वीज मिळणार दिली जाणार असून घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्याचा खर्च केंद्र सरकार करणार आहे. (PM Surya Ghar Yojana) तसेच रूफटॉप सोलर पॅनलसाठी अर्ज करणाऱ्यांना १ किलोवॅट पॅनेलसाठी एकूण ३० हजार रुपये, २ किलोवॅट पॅनेलसाठी ६० हजार रुपये, तर ३ किलोवॅट किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या पॅनेलसाठी ७८ हजार रुपये अनुदान उपलब्ध केले जाईल.
योजनेचा लाभार्थी ‘असा‘ असावा
या योजनेचा लाभ घेणारा अर्जदार हा भारताचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. तसेच त्याचे स्वत:चे घर असावे आणि तो गरीब वा मध्यम उत्पन्न धारक असायला हवा. तरच ते कुटुंब योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकते. आणखी एक महत्वाचे म्हणजे, सरकारकडून सोलर सबसिडी मिळवण्यासाठी नेट मीटर बसवल्यानंतर DISCOM द्वारे पडताळणी करून घ्यावी.
(PM Surya Ghar Yojana) यानंतर, पोर्टलवरून तुम्हाला एक कमिशनिंग प्रमाणपत्र जारी केले जाईल. याचा थेट अर्थ असा की, तुम्ही आता या योजनेसाठी अर्ज केला आहे. मात्र सबसिडीसाठी तुम्हाला आवश्यक ते कागदपत्र अपलोड करावे लागतील. दरम्यान प्रमाणपत्र जारी केल्यावर आपल्या बँक खात्याचा तपशील आणि रद्द केलेला धनादेश पोर्टलवर सबमिट करावा. यानंतर सरकारमार्फत सबसिडी तुमच्या बँक खात्यावर पाठवली जाईल.
कसा कराल अर्ज? (PM Surya Ghar Yojana)
सोलर सबसिडीसाठी अर्ज करायचा असेल तर, सर्वात आधी तुम्ही अधिकृत वेबसाइट https://pmsuryaghar.gov.in ला भेट द्या. यानंतर रुफटॉप सोलरचा पर्याय निवडा. आता तुमचे राज्य आणि वीज वितरण कंपनीचे नाव निवडून तुमचा वीज ग्राहक क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ईमेल टाका. (PM Surya Ghar Yojana) पुढे ग्राहक क्रमांक आणि मोबाइल नंबर सबमिट करा आणि नवीन पेजवर लॉगिन करा.
आता तुमच्यासमोर फॉर्म ओपन होईल. त्यावर दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार रूफटॉप सोलर पॅनेलसाठी अर्ज करा. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला व्यवहार्यता मंजूरी मिळेल आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या डिस्कॉममध्ये नोंदणीकृत विक्रेत्याकडून प्लांट स्थापित करू शकता. मात्र लक्षात घ्या, सोलर पॅनेल बसवल्यानंतर तुम्हाला प्लांटच्या तपशीलांसह नेट मीटरसाठी अर्ज करावा लागेल. तो विसरू नका. (PM Surya Ghar Yojana)