Wednesday, February 8, 2023

दणका! वाधवान पिता-पुत्रांना कोर्टाने अंतरिम जामीन नाकारला

- Advertisement -

मुंबई । पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाधवान पिता-पुत्राचा अंतरिम जामीन अर्ज विशेष पीएमएलए न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे वाधवान पिता-पुत्रांसाठी हा मोठा दणका असल्याचं मानलं जात आहे. न्यायामूर्ती पी. राजवैद्य यांच्या न्यायालयात आज ही तातडीची सुनावणी झाली.

राकेश वाधवान आणि सारंग वाधवान हे दोघेही पिता-पुत्र पीएमसी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार आहेत. त्यांनी पीएमएलए कोर्टात अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला. दरम्यान, आर्थर रोड तुरुंगात कोरोनाची लागण झालेले कैदी वाढत असून आम्हाला विविध प्रकारचे आजार आहेत आणि त्यामुळे आम्हाला धोका वाढत आहे. त्यामुळे अंतरिम जामीन देण्यात यावा, असे या दोघांनीही कोर्टात सादर केलेल्या अर्जात म्हटलं होतं. मात्र, कोर्टाने या दोघांचीही विनंती अमान्य करत त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

- Advertisement -

मार्च महिन्यातही वाधवान पिता-पुत्रांनी कोरोनाचं कारण पुढे करत जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावेळी मॅजिस्ट्रेट कोर्टाने जामीनही दिला होता. मात्र, त्यानंतर ईओडब्ल्यूने या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आदेशला स्थगितीही देण्यात आली होती. त्यानंतर वाधवान पिता-पुत्रांनी आज पुन्हा कोरोनाचं कारण पुढे करत अंतरिम जामीन मागितला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”