PMC Recruitment 2023 : पुणे महानगरपालिकेत 320 जागांसाठी भरती; इथे करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना सुवर्णसंधी आहे. पुणे महानगरपालिकेत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 320 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 28 मार्च 2023
ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – पुणे महानगरपालिका, पुणे

पद संख्या – 320 पदे

भरली जाणारी पदे

क्ष-किरण तज्ञ ( रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट) – 08 पदे
वैदयकीय अधिकारी/ निवासी वैदयकीय अधिकारी – 20 पदे
उप संचालक – 01 पद
पशुवैदयकीय अधिकारी – 02 पदे
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/ सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/ विभागीय आरोग्य निरीक्षक – 20 पदे
कनिष्ठ अभियंता – 10 पदे (PMC Recruitment 2023)
आरोग्य निरीक्षक/ सॅनिटरी इन्स्पेक्टर – 40 पदे
वाहन निरीक्षक/ व्हेईकल इन्स्पेक्टर मिश्रक/ औषध निर्माता – 03 पदे
मिश्रक/ औषध निर्माता – 15 पदे
पशुधन पर्यवेक्षक ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) – 01 पद
अग्निशामक विमोचक / फायरमन – 200 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 मार्च 2023

अर्ज फी –

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 1000/-
मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 900/-

आवश्यक शैक्षणिक पात्रता – खालील PDF पहा

मिळणारे वेतन – 

क्ष-किरण तज्ञ ( रेडिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट) वेतन श्रेणी एस-२३ : Rs. ६७७००- २०८७०० दरमहा
वैदयकीय अधिकारी/ निवासी वैदयकीय अधिकारी वेतन श्रेणी एस २०: Rs. ५६१००-१७७५०० दरमहा
उप संचालक वेतन श्रेणी एस – १८: Rs. ४९१००-१५५८०० दरमहा
पशुवैदयकीय अधिकारी वेतन श्रेणी एस – १५: Rs. ४१८००-१३२३०० दरमहा
वरिष्ठ आरोग्य निरीक्षक/ सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर/ विभागीय आरोग्य निरीक्षक वेतन श्रेणी एस – १५: Rs. ४१८००-१३२३०० दरमहा (PMC Recruitment 2023)
कनिष्ठ अभियंता वेतन श्रेणी एस-१४: Rs. ३८६०० १२२८०० दरमहा
आरोग्य निरीक्षक/ सॅनिटरी इन्स्पेक्टर वेतन श्रेणी एस – १३: Rs. ३५४००-११२४०० दरमहा
वाहन निरीक्षक/ व्हेईकल इन्स्पेक्टर मिश्रक/ औषध निर्माता वेतन श्रेणी एस १३: Rs.३५४००-११२४०० दरमहा
मिश्रक/ औषध निर्माता वेतन श्रेणी एस १०: Rs.२९२०० ९२३०० दरमहा
पशुधन पर्यवेक्षक ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) वेतन श्रेणी एस ८ : Rs. २५५००-८११०० दरमहा
अग्निशामक विमोचक / फायरमन वेतन श्रेणी एस ६ : Rs. १९९००-६३२०० दरमहा

असा करा अर्ज –

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज भरावे.
अर्ज नोंदणी करण्यासाठी, “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा” टॅब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ईमेल आयडी प्रविष्ट करा.
उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात भरलेले तपशील काळजीपूर्वक भरावेत आणि त्याची पडताळणी करावी
उमेदवारांनीअर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.
वरील मुदत संपल्यानंतर सादर केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

निवड प्रक्रिया –

जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या परीक्षा घेणे सोयीस्कर नसल्यास परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीत दिलेल्या शैक्षणिक अर्हता आणि / अथवा अनुभव यापेक्षा जादा शैक्षणिक अर्हता / अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे निकष निश्चित करून अंतिम परीक्षेस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल.
परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेतली जाईल.
परीक्षेचे ठिकाण दिनांक व वेळ ई-मेल किंवा एस. एम. एस. (SMS) द्वारे संबंधित उमेदवारांना कळविण्यात येईल. तसेच पुणे महानगरपालिका अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्धीस देऊन माहिती कळविण्यात येईल.
उमदेवारांना आवश्यक केलेली अर्हता अथवा अनुभव शिथील केला जाणार नाही.
उमेदवारांची निवड निव्वळ गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
परिक्षेनंतर पात्र उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in