हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PNB : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता सार्वजनिक क्षेत्रातील देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बँक असलेल्या PNB ने नवीन वर्ष निमित्त ग्राहकांसाठी जबरदस्त फिक्स्ड डिपॉझिट्स स्कीम सुरु केल्या आहेत, ज्यावर आता 8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज दर दिला जाईल. सध्या बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर इतका व्याज दर देत आहे. यामुळे जर आपण नवीन वर्षात गुंतवणूक करणार असाल, तर PNB चा पर्याय निवडता येईल.
व्याज दर जाणून घ्या
हे लक्षात घ्या कि, PNB च्या या नवीन फिक्स्ड डिपॉझिट्सचा कालावधी 666 दिवसांचा असेल. ज्यावर 8.10 टक्के दराने व्याज मिळेल. यापूर्वी, यावर 7.85 टक्के दराने व्याज दिले जाते होते. पंजाब नॅशनल बँकेने ट्विट करत याबाबत माहिती देताना म्हंटले कि, ‘या नवीन वर्षाची सुरुवात आनंदाच्या थोड्या बचतीने करूया!’ पीएनबी वन अॅप, इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून या योजनेमध्ये गुंतवणुकीसाठी अर्ज करता येईल. अधिक माहितीसाठी, बँकेच्या शाखेला भेट द्या.
फिक्स्ड डिपॉझिट वरील व्याजदर
PNB कडून सध्या 7 दिवस ते 10 वर्षांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर सर्वसामान्य नागरिकांना 3.50 टक्के ते 6.10 टक्के दराने व्याज दिले जात आहे. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांना याच कालावधीच्या फिक्स्ड डिपॉझिटवर 4 टक्के ते 6.90 टक्के तर अत्यंत ज्येष्ठ नागरिकांना 4.30 ते 6.90 टक्के व्याज दर मिळत आहे. इथे हे लक्षात घ्या कि, बँक 666 दिवसांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर 8.10 टक्के वार्षिक दराने व्याज देत आहे.
अनेक बँकांनी FD चे दर वाढवले आहेत
अलीकडेच इंडियन ओव्हरसीज बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, येस बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
RBI कडून रेपो दरात वाढ
अलीकडेच, RBI ने डिसेंबरच्या धोरणात रेपो दरात आणखी 0.35 टक्क्यांनी वाढ आहे. या दरवाढीनंतर, रेपो दर आता 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.pnbindia.in/Interest-Rates-Deposit.html
हे पण वाचा :
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू Lionel Messi ची एकूण संपत्ती किती ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या
FD Rates : ‘या’ बँकेच्या FD वर मिळेल 8.80% पर्यंत व्याज, इतर बँकांचे व्याजदर तपासा
Gold Price : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
Recharge Plan : फक्त 225 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे अनलिमिटेड व्हॅलिडिटी
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, खात्यामध्ये पाठवले जाणार इतके रुपये