हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PNB : सरकारी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेकडून आपल्या ग्राहकांसाठी WhatsApp बँकिंग सर्व्हिस सुरू करण्यात आहे. यामुळे आता बँकेच्या ग्राहकांसोबतच इतर लोकांना देखील या नव्या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. ही व्हॉट्सऍप बँकिंग सर्व्हिस सुट्ट्यांसह 24 तास उपलब्ध करून देण्यात आली आहे. जी अँड्रॉइड आणि आयओएस-बेस्ड मोबाईल फोनवरही वापरता येईल.
बँकेने एक निवेदन देताना म्हटले गेले की, WhatsApp वर ही बँकिंग सुविधा ऍक्टिव्ह करण्यासाठी ग्राहकांना PNB चा अधिकृत WhatsApp क्रमांक 919264092640 आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करावा लागेल. या नंबरवर हाय/हॅलो पाठवून संभाषण (WhatsApp वर) सुरू करावे लागेल. यानंतर, बँकेशी संबंधित सर्व सेवांचा लाभ घेता येईल. मात्र संभाषण सुरू करण्यापूर्वी ग्राहकांनी व्हॉट्सऍपवरील PNB च्या प्रोफाईलवर ‘ग्रीन टिक’ आहे का याची खात्री करायला हवी.
WhatsApp बँकिंगद्वारे मिळणार ‘या’ सुविधा
सध्या PNB बँकेकडून खातेधारकांना व्हॉट्सऍप बँकिंगद्वारे बॅलन्स इनक्वायरी, शेवटचे 5 ट्रान्सझॅक्शन, स्टॉप चेक, रिक्वेस्ट चेक बुक यासारख्या नॉन-फायनान्शिअल सर्व्हिस देते. याशिवाय खाते असलेल्या आणि खाते नसलेल्या लोकांनाही पुरवल्या जाणाऱ्या इतर माहितीच्या सर्व्हिसमध्ये ऑनलाइन खाते उघडणे, बँक डिपॉझिट्स/लोन, डिजिटल प्रॉडक्ट्स, NRI सर्व्हिस, शाखा/एटीएम शोधणे, ऑप्ट-इन, ऑप्ट-आउटचा समावेश आहे.
PNB कडून कर्जावरील व्याजदरात वाढ
PNB कडून नुकतेच आपल्या व्याजदरात वाढ करण्याची घोषणा करण्यात आली होती. बँकेने दिलेल्या माहितीनुसार 1 सप्टेंबरपासून ही दर वाढ लागू झाली आहे. ज्यामुळे आता एक वर्षाच्या कालावधीसाठीचा MCLR 7.70 टक्के असेल, जो पूर्वी 7.65 टक्के होता. त्याच वेळी, तीन वर्षांच्या कालावधीसाठी MCLR आता आठ टक्के असेल. त्यातही 0.05 टक्के वाढ करण्यात आली आहे. इथे हे लक्षात घ्या कि, बहुतेक ग्राहक कर्जे ही MCLR शी जोडली आहेत.
आरबीआयने व्याजदरात वाढ केली आहे
याशिवाय आता एक महिना, तीन महिने आणि सहा महिन्यांच्या कर्जावरील व्याजदर 7.10 – 7.40 टक्के असणार आहे. तसेच एका दिवसाच्या कालावधीतील MCLR आता 7.05 टक्के असेल. या महिन्याच्या सुरुवातीला, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने धोरणात्मक दरात वाढ केल्यानंतर पीएनबीने रेपो-लिंक्ड लोन रेट 0.50 टक्क्यांनी वाढवून 7.90 टक्के केला होता.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.pnbindia.in/interst-rate-on-advances-linked-to-mclr.html
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत मोठा बदल !!! नवीन दर पहा
WhatsApp द्वारे अशा प्रकारे पाठवता येतील 2 GB पर्यंतचे चित्रपट !!!
Telegram ने भारतीय युझर्ससाठी प्रीमियम सबस्क्रिप्शनची किंमत केली कमी
Share Market Holiday : साप्ताहिक सुट्ट्यांव्यतिरिक्त ऑक्टोबरमध्ये इतके दिवस शेअर बाजार राहणार बंद