हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Dental Health Insurance : सध्याचे जग हे धावपळीचे आहे. या धावपळीच्या जगात प्रत्येकाची खूप दमछाक होते आहे. यामुळे अनेक अनेकांची जीवनशैली देखील बदलली गेली आहे. या बदलणाऱ्या जीवनशैलीचा सर्वाधिक परिणाम आपल्या आरोग्यावर झाला आहे. यामुळे अनेक नवनवीन आजारांना देखील तोंड द्यावे लागत आहे. अशातच सतत वाढणाऱ्या महागाईमुळे योग्य उपचार करणेही अवघड होऊन बसले आहे.
वैद्यकीय उपचारांचा खर्च इतका वाढला आहे की, योग्य रुग्णालयात उपचार घेणे देखील सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर झाले आहे. अशातच जर एखाद्याला आजारपणामुळे किमान एक दिवस जरी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले तरी हा खर्च हजारो रुपयांच्या घरात जातो आहे. अशा परिस्थितीत इन्शुरन्स आपल्याला एक मोठा आधार ठरतो. Dental Health Insurance
आजकाल जवळपास प्रत्येक व्यक्तीमध्ये दातांची समस्या दिसून येते आहे. हे लक्षात घेऊनच PNB MetLife ने एक नवीन डेंटल केअर प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये लोकांना दातांच्या उपचारांसाठी खर्च करावा लागणार नाही. यासाठी PNB MetLife ने देशभरातील सुमारे 340 हून जास्त डेंटल क्लीनिकशी देखील करार केला आहे. डेंटल OPD बेनेफिट्स सह सर्व प्रकारच्या दातांच्या उपचारांचा खर्च कव्हर करणारा हा देशातील बहुधा पहिलाच हेल्थ इन्शुरन्स प्लॅन आहे, असा दावा देखील PNB MetLife ने केला आहे. Dental Health Insurance
या प्लॅनमध्ये, तुम्ही फक्त 3,006 रुपयांमध्ये दातांच्या उपचारांसाठी.50,000 रुपयांपर्यंत मदत मिळू शकेल. या प्लॅनमध्ये प्रत्येक प्रक्रियेसाठी 350 रुपयांपासून ते 7500 रुपयांपर्यंतचे फिक्स्ड बेनेफिट्स आणि 50 हजार रुपयांपर्यंतची विमा रक्कम दिली जात आहे. याबरोबरच याची सर्वांत महत्वाची गोष्ट अशी कि या प्लॅनद्वारे आपल्याला आयकर कलम 80D अंतर्गत टॅक्स बेनेफिट देखील घेता येईल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.pnbmetlife.com/insurance-plans/family-protection/dental-care-plan.html
हे पण वाचा :
farmer: म्हणून तरुण शेतकऱ्याने कांदा सरळ जनावरांपुढे टाकून दिला..
Smartphones वर बंद झालेली कॉल रेकॉर्डिंगची सुविधा अशा प्रकारे सुरु करा
Gold Loan : पैशांची गरज भासतेय ??? ‘या’ बँकांकडून स्वस्त दरात मिळेल गोल्ड लोन
johny depp : खरंच… जॉनी डेप आपल्या वकिलासोबत डेट करतोय ??? पहा फोटो
Health : शरीराच्या कोणत्या भागाकडून सर्वाधिक ऊर्जा वापरली जाते???