Online Banking : चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झालेत ??? अशा प्रकारे परत मिळवा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Online Banking : आजकाल मोबाईल बँकिंगचा वापर वाढलेला आहे. मोबाईल बँकिंगमुळे अगदी सहजपणे पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करता येतात. मात्र बऱ्याचदा चुकून भलत्याच खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात, मात्र हे पैसे देखील परत मिळू शकतात. अशा परिस्थितीत कधी-कधी बँकिंग फसवणूकही होण्याची शक्यता असते. चला तर चुकीच्या खात्यात ट्रान्सफर केलेले पैसे परत कसे मिळवायचे ते जाणून घेउयात…

अशा प्रकारे पैसे परत मिळवा (Online Banking)

चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यास तत्काळ आपल्या बँकेला याबाबतची माहिती द्या.

याशिवाय कस्टमर केअरला देखील फोन करून संपूर्ण माहिती द्या.

जर बँकेने तुम्हाला ई-मेलवर सर्व माहिती मागितली तर त्यात चुकीने झालेल्या या ट्रान्सझॅक्शनची संपूर्ण माहिती द्या.

ट्रान्झॅक्शनची तारीख आणि वेळ, आपला खाते क्रमांक आणि ज्या खात्यात चुकून पैसे ट्रान्सफर केले गेले आहेत ते डिटेल्स द्या.

Covid-19 has increased the adoption of online banking

पैसे परत मिळण्यास किती वेळ लागेल ? (Online Banking)

या संपूर्ण प्रक्रियेनंतर पैसे लगेचच परत मिळू शकतात.

मात्र काही वेळा त्यासाठी 2 महिने देखील लागू शकतात.

आपल्या बँकेतून कोणत्या शहरातील कोणत्या शाखेत पैसे कोणत्या खात्यात ट्रान्सफर झाले आहेत याची माहिती मिळू शकेल.

तुम्ही बँकेच्या शाखेशी बोलून पैसे काढण्याचा प्रयत्न करू शकता.

यानंतर बँकेकडून ज्याच्या खात्यात चुकून पैसे ट्रान्सफर झाले आहेत त्या व्यक्तीची माहिती सदर बँकेला दिली जाईल.

यानंतर बँक त्या व्यक्तीकडून चुकीच्या पद्धतीने ट्रान्सफर केलेले पैसे परत करण्याची परवानगी मागेल .

Online Banking Definition

दुसरी पद्धत वापरता येईल (Online Banking)

ज्या व्यक्तीच्या खात्यात चुकून पैसे ट्रान्सफर झाले आहेत जर त्याने ते परत करण्यास नकार दिला तर त्याच्याविरुद्ध न्यायालयात खटलाही दाखल केला जाऊ शकतो. पैसे परत न करणे हा अधिकार रिझर्व्ह बँकेच्या नियमांच्या उल्लंघनाच्या संदर्भात आहे.

मात्र येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की, RBI ने बँकांना सूचना देखील दिल्या आहेत की जर चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे जमा झाले तर तुमच्या बँकेला लवकरात लवकर त्यावर कारवाई करावी लागेल.

How safe is online banking on a mobile phone?

अधिक माहितीसाठी RBI च्या वेबसाईटला भेट द्या :  https://www.rbi.org.in/commonman/English/Scripts/Notification.aspx?Id=916

 

हे पण वाचा : 

Tax Saving : डोनेशन दिल्यानंतर वाचवता येईल टॅक्स??? कसे ते समजून घ्या

मॅप्रो. फुड्स कंपनीतील चोरीचा छडा : वाई पोलिसांनी 35 लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत

गुजरात ATS ची मोठी कारवाई : 1993 च्या मुंबई बॉम्ब ब्लास्टप्रकरणी चौघांना अटक

ICICI Bank कडून ​​FD च्या व्याजदरात वाढ !!! नवीन दर पहा

 

Leave a Comment