नागपुरातील गोरेवाडा जंगलाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये (Nagpur) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये नागपूरच्या (Nagpur) गोरेवाडा जंगलाला भीषण आग लागली आहे. या आगीमुळे जंगलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भीषण आगीत जंगलातील वाळलेला पालापाचोळा तसेच लाकडं जळून खाक झाली आहेत. हि आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अजून समजू शकलेले नाही. पण, या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल आणि वन विभागाला यश आले आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. जंगलातील वाळलेलं गवत आणि पाला पाचोळा यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले होते.

आग कशी लागली याची माहिती मिळू शकली नाही. एखाद्यानं पेटती सिगारेट फेकली, तरी आग फडकू शकते. उन्हाचे दिवस असल्यानं आग पसरते. त्यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यापूर्वी अशीच एक घटना सालेबर्डीच्या जंगलात घडली होती. त्या जंगलाला आग लागल्यामुळं मोठं नुकसान झालं होतं. गेल्या पंधरा दिवसातील ही नागपुरातील (Nagpur) जंगलाला लागलेली दुसरी मोठी आगीची घटना आहे.

चंद्रपुरातही आगीची घटना
दोन दिवसांपूर्वी चंद्रपूरच्या जंगलात अशीच आग लागली होती. त्यातदेखील जंगलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने आगीच्या अशा घटना घडत असतात त्यामुळे आग नियंत्रण करणारी यंत्रणा सक्षम करण्याची गरज आहे.

हे पण वाचा :

म्हणून तरुण शेतकऱ्याने कांदा सरळ जनावरांपुढे टाकून दिला..

IND vs ENG : इंग्लंड विरुद्धच्या टेस्टसाठी टीम इंडियाची घोषणा ! ‘या’ खेळाडूचे झाले पुनरागमन

ठाकरे सरकारकडून जनतेला दिलासा : पेट्रोल 2 रुपये 8 पैशांनी तर डिझेल 1 रुपये 44 पैशानी स्वस्त

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला थेट संभाजीराजे छत्रपतींना फोन; म्हणाले की…

राज ठाकरे…माफी नाही तर युपीही नाही, आम्ही सापळा रचला नाही; बृजभूषण सिंह यांचा हल्लाबोल