हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PNB : पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. आता बँकेच्या ग्राहकांना घरबसल्या FD वर ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळेल. यासाठी त्यांना बँकेच्या शाखेत जावे लागणार नाही. आता बँकेचे ग्राहक पीएनबी वन ऍप किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे घरबसल्या ओव्हरड्राफ्टसाठी अर्ज करू शकतील.
मात्र हे लक्षात घ्या कि, ओव्हरड्राफ्टमध्ये पैसे घेतलेल्या वेळेसाठी व्याज द्यावे लागते. मात्र यासोबतच बँकेच्या ग्राहकांना या व्याजदरातही सवलत दिली जाणार आहे. इतकेच नाही तर बँकेकडून PNB One सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून अर्ज केल्यास व्याजावर 0.25 टक्के सूट देण्याचीही घोषणा करण्यात आली आहे.
या सुविधेचा लाभ कसा घ्यावा ???
ओव्हरड्राफ्ट हे एक प्रकारचे कर्ज असते. यामध्ये ग्राहकांना बँक खात्यातून शिल्लक रकमेपेक्षा जास्त पैसे काढता येतात. मात्र हे अतिरिक्त पैसे ठराविक कालावधीमध्ये परत करावे लागतील, तसेच यासाठी व्याजही द्यावे लागेल. मात्र व्याज कमी असते.
Introducing Overdraft (eOD) against Fixed Deposit to making your process seamless through PNB One mobile app.
Also, get a concession of 0.25% on applying through the app.#FixedDeposit #Loan #Banking #AzadiKaAmritMahotsav #AmritMahotsav@AmritMahotsav pic.twitter.com/G8sWSp12fH— Punjab National Bank (@pnbindia) October 11, 2022
किती पैसे घेता येतील ???
बँकांकडून FD च्या सध्याच्या मूल्याच्या 90% पर्यंत ओव्हरड्राफ्ट घेण्याची परवानगी मिळते. तसेच या सुविधेचा व्याजदर हा FD वर देण्यात येणाऱ्या व्याजापेक्षा 1-2% जास्त असेल. उदाहरणार्थ, जर एखाद्याला FD वर 6% वार्षिक रिटर्न मिळत असेल तर ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी 7-8% वार्षिक व्याज आकारले जाईल.
पीएनबीच्या माय सॅलरी अकाउंटमध्ये वेगवेगळ्या श्रेणींनुसार ओव्हरड्राफ्टचे लिमिट देण्यात आले आहे. यामध्ये चांदीसाठी 50000 रुपये, सोन्यासाठी 150000 रुपये, प्रीमियमसाठी 225000 रुपये आणि प्लॅटिनमसाठी 300,000 रुपयांपर्यंतची ओव्हरड्राफ्ट सुविधा दिली जाईल. यासोबतच स्वीपची सुविधा देखील मिळते.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.pnbindia.in/online-overdraft-facility.html
हे पण वाचा :
Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात साप्तहिकरीत्या वाढ, गेले आठवडाभर सराफा बाजाराची स्थिती कशी होती ते जाणून घ्या
FD Rates : खासगी क्षेत्रातील ‘या’ बँकेने फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात केली वाढ, असे असतील नवीन दर
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज
Post Office च्या बचत योजनांवर आता मिळणार जास्त व्याज !!!
Business : घरबसल्या ‘या’ 5 मार्गांनी दरमहा करता येईल हजारोंची कमाई !!!