Thursday, March 23, 2023

कार ड्रायव्हरची एक चूक महिलेच्या जीवावर बेतली, भयंकर अपघाताचा Video आला समोर

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आपण अपघाताचे (accident) अनेक व्हिडिओ पहिले असतील. यामध्ये बहुतेक वेळा ड्रायव्हरचीच चुकी असते. कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधील असाच एक भयंकर अपघाताचा (accident) व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

काय घडले नेमके?
एक महिला स्कूटीवरून जात असताना अचानक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारचा दरवाजा अचानक उघडला आणि स्कूटीवर बसलेली महिला कारच्या दरवाजाला धडकली आणि रस्त्यावर पडली. यानंतर मागून येणाऱ्या दुसऱ्या कारने महिलेला धडक (accident) दिली. यानंतर आजूबाजूंच्या लोकांनी स्कूटी चालवणाऱ्या महिलेला वाचवण्यासाठी धाव घेतली.

- Advertisement -

अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ (accident) सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. कारचालकाच्या बेजबाबदारपणाला अनेक युजर्स शिव्यांची लाखोली वाहत आहेत. अशा कारचालकांना चांगलाच धडा शिकविण्याची गरज असल्याचं मत सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकाने कार चालवताना खबरदारी बाळगणे आणि कारचा दरवाजा उघडण्यापूर्वी पाठीमागून कोणी येते आहे का, याची खात्री करणे गरजेचे आहे.
हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती