Poco C55 : Poco ने लाँच केला स्वस्तात मस्त Mobile; किंमत 10 हजारांपेक्षा कमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Poco ने आपला नवा स्मार्टफोन C55 भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे. हा मोबाईल 3 रंगाच्या पर्यायामध्ये उपलब्ध आहे. इतर मोबाईलच्या तुलनेत हा मोबाईल काहीसा स्वस्त आहे. आज आपण या स्मार्टफोनची खास वैशिष्ठ्ये, आणि त्याच्या किमतीबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

6.71-इंच डिस्प्ले-

Poco C55 ला 60Hzरिफ्रेश रेटसह 6.71-इंचाचा HD Plus LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा पीक ब्राइटनेस 534 nit आणि टच सॅम्पलिंग रेट 120Hz आहे. हा मोबाईल MediaTek Helio G85 चिपसेटसह येतो. ग्राफिक्ससाठी, यात आर्म माली-जी52 जीपीयूचा सपोर्ट आहे त्यामुळे गेम खेळण्यासाठी हा स्मार्टफोन जबरदस्त आहे.

Poco C55

कॅमेरा- Poco C55

मोबाईलच्या कॅमेरा बाबत सांगायचं झाल्यास Poco C55 ला ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. यामध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ कॅमेरा सेन्सर उपलब्ध असेल. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॅल्लिंग साठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Poco C55 ला 5000mAh बॅटरी मिळते जी 10w बॅटरीला सपोर्ट करते.

Poco C55

फीचर्स –

मोबाईलच्या अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास यामध्ये GPS, Wi-Fi, 4G, मायक्रो-USB पोर्ट आणि ब्लूटूथ व्हर्जन 5.1 सारखी वैशिष्ट्ये आहेत. तर सुरक्षिततेसाठी, स्मार्टफोनच्या पाठीमागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

Poco C55

किंमत किती-

हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल. तुम्ही 28 फेब्रुवारीला हा मोबाईल खरेदी करू शकाल. Poco C55 फॉरेस्ट ग्रीन, कूल ब्लू आणि पॉवर ब्लॅक या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येईल. मोबाईलच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, याची किंमत त्याच्या स्टोरेज नुसार वेगवेगळी आहे. त्यानुसार, Poco C55 च्या 4GB रॅम, 64GB स्टोरेज व्हेरिएन्टची किंमत 9,499 रुपये आहे. तर 6GB रॅम, 128GB स्टोरेज व्हेरिएन्टची किंमत 10,999 रुपये आहे.