POCO C61 हा स्मार्टफोन भारतीय विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. मागील आठवड्यात हा मोबाईल लाँच करण्यात आला होता. अतिशय कमी अशी किंमत आणि त्यामानाने देण्यात आलेले अनेक दमदार फीचर्स यामुळे पोकोचा हा मोबाईल ग्राहकांच्या चांगलच्या पसंतीला उतरेल यात शंका नाही. आजपासून ग्राहक हा स्मार्टफोन प्रसिद्ध ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरन खरेदी करू शकतात. त्यासाठी त्याची किंमत किती आहे? या मोबाईल मध्ये काय फीचर्स देण्यात आलेत हे आपण जाणून घेउयात.
किती रुपये किंमत ? POCO C61
Poco C61 या स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, या मोबाईलच्या 6GB+64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 7,499 रुपये आहे तर 6GB+128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 8,499 रुपये आहे. सध्या फ्लिपकार्टवर अर्ली बर्ड ऑफर असून या ऑफर अंतगर्त हा स्मार्टफोन अनुक्रमे 6,999 आणि 7,999 रुपयांना खरेदी करता येईल. ग्राहक हा मोबाईल मिस्टिकल ग्रीन, इथरियल ब्लू आणि डायमंड डस्ट ब्लॅक रंगात उपलब्ध आहे.
फिचर्स काय?
Poco C61 मध्ये 90Hz रिफ्रेश रेट सह 6.71 इंचाचा LCD डिस्प्ले आहे. या डिस्प्लेला 720×1650 पिक्सेल रिझोल्युशन आणि 500nits पीक ब्राइटनेस मिळतो. कंपनीने या मोबाईल मध्ये MediaTek Helio G36 SoC प्रोसेसर बसवला असून हा मोबाईल Android 14 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. मोबाईल मध्ये 5000 mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 10W चार्जिंगला सपोर्ट करते.
कॅमेरा-
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Poco C61 मध्ये 8-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, 0.08-मेगापिक्सलचा दुय्यम कॅमेरा आहे. आणि समोरील बाजूला 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर कनेक्टिव्हिटी साठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट, 3.5 मिमी हेडफोन जॅक, 4G, ड्युअल सिम, GNSS, वाय-फाय 5 आणि ब्लूटूथ 5.3 यांसारखे फीचर्स या स्मार्टफोनमध्ये मिळतात.