कविता माणसाच्या मनातील वेदनेला फुंकर घालून भावनेला वाट मोकळी करते : कवी अनंत राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात नुकताच सांस्कृतिक विभाग आणि परीस्पर्श पब्लिकेशन कराड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. दिलीप कुमार मोहिते लिखित पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कवी अनंत राऊत यांनी “कविता माणसाच्या मनातील वेदनेला फुंकर घालून भावनेला वाट मोकळी करून देते. आज पौर्णिमा काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना मला मनस्वी आनंद होत आहे, असे प्रतिपादन कवी राऊत यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सौ. शुभांगी गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे, काव्यसंग्रहाचे लेखक कवी प्रा. दिलीप कुमार मोहिते, परिसस्पर्श पब्लिकेशनचे प्रकाशक श्री प्रमोद मोहिते, लवंडमाची गावचे सरपंच विजयराव दुर्गवळे, रामदास सरोदे, प्रा. प्रमोद सुकरे, प्रा. आबासाहेब कणसे, जुगलकिशोर ओजा, कवयित्री विजया पाटील, कवी भीमाशंकर खुळपे आदी उपस्थित होते.

यावेळी कवी अनंत राऊत म्हणाले की, अनंत अडचणी समोर असताना पत्नीसाठी केलेले प्रयत्न वाया गेले. संसाराची गाडी सुरळीत असताना पत्नी मध्येच सोडून गेली. अर्ध्या वाटेवरती संसार मोडला परंतु पत्नीच्या विरहाने साचलेले दुःख पौर्णिमा काव्यसंग्रहाच्या माध्यमातून कवीने जनमानसाचा समोर आणले आहे.

यावेळी प्राचार्य सौ. शुभांगी गावडे, कवी प्रा. दिलीप कुमार मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य प्रो. सतीश घाटगे यांनी केले. परिचय सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. मारुती सूर्यवंशी यांनी केला. आभार प्रा. सुरेश यादव यांनी व्यक्त केले.