सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
आरेवाडी यात्रेनिमित्त शनिवारी देवेंद्र फडणवीस आणि गोपिचंद पडळकर यांनी बिरोबा देवाचे दर्शन घेतले. बिरोबाची खोटी शपथ घेऊन धनगर समाजाची फसवणूक केल्याने आज राष्ट्रवादीकडून बिरोबा मंदिरात गोमूत्र शिंपडून मंदिर स्वच्छ करून फडणवीस आणि पडळकर यांचा निषेध करण्यात आला.
राष्ट्रवादीचे नेते अजित दुधाळ यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. समाजाला व बिरोबाला फसवुन परत आरेवाडी मंदिरात येऊन गेल्याने बिरोबाच्या मंदिराचे पावित्र अखंडीत रहावे म्हणुन देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आणि गोपिचंद पडळकर यांनी बिरोबाची खोटी शपथ घालुन फसवणुक केली होती म्हणुन आज अजित दुधाळ यांच्या नेतृत्त्वाखाली मंदिर परिसर आणि मंदिराचा गाभारा गोमुत्र शिंपडुन स्वच्छ करुन आंदोलन करण्यात आले.
यावेळी बिरोबाच्या नावान चांगभल आणि यळकोट यळकोट जय मल्हार च्या घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमुन गेला होता. यावेळी माजी नगरसेवक युवराज गायकवाड, पप्पु कोळेकर, प्रकाश मदने, रोहन भंडारे, नवनाथ माळी, अनिल मदने, संजय चव्हाण, दादासो मदने व समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.