Sunday, June 4, 2023

विद्यार्थ्यांच्या रिक्षाला अपघात; पिकअप गाडीची पाठीमागून धडक

पुणे | पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचनमधील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या रिक्षाला अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पीकअप ट्रकने रिक्षाला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. सोलापूर – पुणे मार्गावर खेळेकर मळा या ठिकाणी हा अपघात झाला असून जखमी विद्यार्थ्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्वामी विवेकानंद विद्यालयात शिकणाऱ्या 7 वी तील विद्यार्थ्यांच्या रिक्षाला बोरीभडक ग्रामपंचायत हद्दीत पिकअपने पाठिमागून ठोकर दिली. या ठोकरीत रिक्षा महामार्गालगत रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. रिक्षा पलटी होऊन रिक्षा चालक जमिनीवर आदळल्याने रिक्षा चालक संदिप कोळपे यांना डोक्याला गंभीर मार बसला आहे. अपघातावेळी रिक्षात 7 मुली 2 मुले होते. सर्व मुले बोरीभडक गावचे हद्दीत राहणारे आहेत.

अपघातातील सर्व जखमींना तात्काळ कस्तुरी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेने उरुळी कांचन येथील येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातातील सर्व विद्यार्थी हे सुखरुप असून मुलाना किरकोळ जखम झाली आहे तर रिक्षा चालकाच्या कानाला आणि डोक्याला जखम आहे .