व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कौतुकास्पद ! पॉईंटमन मयूर करणार बक्षीसातील आर्धी रक्कम करणार दान

नवी दिल्ली वृत्तसंस्था : आपल्या जिवाची पर्वा न करता अतिशय थरारक पद्धतीने रेल्वे रुळावर पडलेल्या लहान मुलाचे प्राण वाचवणाऱ्या पॉईंट मन मयूर शेळके (28) याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. मन हेलावून टाकणाऱ्या त्याच्या व्हिडिओ नंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी देखील मयूरला 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. एव्हढेच नव्हे तर जावा मोटर सायकलचे डायरेक्टर अनुपम थरेजा यांनी मयूरला नवीकोरी जावा मोटर बाईक गिफ्ट देणार असल्याचं ट्विटरवरून जाहीर केले आहे. मात्र मयूरने आपला दानशूरपणा दाखवला आहे  अर्धी रक्कम अंध माता संगीता शिरसाट  यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच रेल्वेकडून मिळालेल्या 50 हजारांपैकी 25 हजार रुपये मयुर शिरसाट कुटुंबाला देणार आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्याने सांगितले आहे की , ‘मला बक्षीस म्हणून मिळालेल्या रकमेतील आर्धी रक्कम मी मुलाच्या शिक्षण आणि कल्यासाठी दान करणार आहे. कारण मला माहित आहे की ते आर्थिकदृष्ट्या बळकट नाहीत. म्हणून मी असा निर्णय घेतल्याचे’ मयूरने स्पष्ट केले आहे.

मयूरवर कौतुकाचा वर्षाव, मिळणार जावा बाईक

जावा मोटर सायकलचे डायरेक्टर अनुपम थरेजा यांनी मयूरला नवीकोरी जावा मोटर बाईक गिफ्ट देणार असल्याचं ट्विटरवरून जाहीर केले आहे. तसेच उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विट करून म्हटलं आहे की,’ मयूर शेळके कडे पोशाख किंवा कॅप नव्हती परंतु त्यानं चित्रपटातल्या धाडसी हिरो पेक्षा अधिक धैर्य दाखवले आहे. आम्ही सर्वजण त्याला सॅल्यूट करायला जावा परिवारासोबत आहोत. मयूर ने आम्हाला दर्शवले आहे की आम्हाला फक्त दररोजच्या लोकांकडे पाहावा लागेल जे आम्हाला चांगल्या जगाकडे जाण्याचा मार्ग दर्शवतात’ असे आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे.

काय होती घटना

मध्य रेल्वेच्या वांगणी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म वरून जाणाऱ्या लहान मुलाचा तोल गेला आणि हा मुलगा रुळावर पडला. समोरून भरधाव वेगानं रेल्वे घेत होती. या मुला समोर असणारी महिला ही अंध होती त्यामुळे ती काहीच करु शकत नव्हती. अशावेळी प्रसंगावधान राखून पॉईंटमन मयूर शेळके यांनी या लहान मुलाला वाचवलं. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे. प्रसंगावधान राखून मयूर शेळके यांनी या चिमुकल्यांचे प्राण वाचवले. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत असून मयूर शेळके यांचे कौतुक होत आहे.