व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

ओगलेवाडी व आगाशिवनगर येथील दुर्गादेवी मंडळावर पोलिसांची कारवाई

कराड | दुर्गादेवी विसर्जन मिरवणूकीत नियमांचा भंग केल्याप्रकरणी दोन मंडळावर कराड शहर पोलीसांनी कारवाई केली. यामध्ये मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व स्पीकर मालक यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे कराड शहर पोलिसांनी सांगितले.

सध्या सगळीकडे सार्वत्रिक दुर्गादेवी उत्सवानिमित्त विसर्जन मिरवणूका सुरू आहेत. कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील दुर्गादेवी विसर्जन मिरवणूकीत ओगलेवाडी येथील श्री गणेश नवरात्र मंडळ ओगलेवाडी यांनी कराड – विटा रस्ता वाहतुकीकरीता बंद करुन प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचा भंग केला. सदर ठिकाणी बंदोबस्तासाठी हजर असणारे पोलीस अधिकारी यांनी आदेश देऊन सुध्दा सदर मंडळाने विनाकारण आडमुठेपणा करुन नाचत होते. त्यामुळे सामान्य नागरीकांना नाहक त्रास झाल्याने तणावपूर्ण परिस्थिती तयार झाली होती. तसेच आगाशिवनगर येथील सन्मित्र गणेश व नवरात्र उत्सव मंडळाने ढेबेवाडी कराड रोडवर ढेबेवाडी कडुन कराडच्या दिशेने येणाऱ्या लेन पुर्णपणे वाहतुकीसाठी बंद करुन कार्यकर्ते रस्त्यावर स्पीकरचा आवाज मोठ्या प्रमाणात करुन नाचले. तसेच दुसऱ्या मंडळांना व प्रवास करणाऱ्यांना पुढे जाण्यासाठी मोकळीक दिली नाही. त्यामुळे दोन्ही मंडळांवर कारवाई करण्यात आली.

कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये. यासाठी दोन्ही मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व स्पीकर मालक यांच्यावर सी. आरपीसी. कलम १०७ या प्रमाणे प्रतिबंधक कारवाई केलेली आहे. आजपासुन पुढेही कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत होणा-या दुर्गादेवी विसंजण मिरवणूकीत कोणी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचा भंग केल्यास त्यांचेवरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याची सर्व नवरात्र उत्सव मंडळांनी नोंद घ्यावी. असा इशारा कराड शहर पोलिसांनी दिला आहे.