मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणार्‍या 48 जणांवर पोलिस व नगरपालिकेच्या पथकाची कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

संचारबंदीच्या काळात जिल्ह्याधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन करून सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणार्‍या 48 जणांवर कराड शहर पोलिस व कराड नगरपालिकेच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी सकाळी कारवाई केली.

महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यात 22 एप्रिल ते 30 एप्रिल संचारबंदी व लॉकडाऊन लागू केला आहे. तसेच जिल्ह्यातही कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याकरीता जिल्हाधिकार्‍यांनी सातारा जिल्ह्यात 22 एप्रिल पासून संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. त्या आदेशाचे उल्लंघन करून कराडकर नागरिक रोज सकाळी मॉर्निंग वॉक करीता मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असल्याचे चित्र कराडात दिसत आहे. त्याच अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील व कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक काळे व कराड शहर गुन्हे प्रकटीकरणचे पथक व कराड नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी शहरात ठिकठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणार्‍या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला. यामध्ये महिला व पुरूष असे एकूण 48 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

सध्या महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाने थैमान घातले आहे. ते संक्रमण तोडण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घरातून मॉर्निग वॉक अथवा इतर कारणाशिवाय बाहेर पडू नये. जिल्हाधिकार्‍यांनी घालून दिलेल्या नियमांचे व अटीचे पालन करावे. कराड शहर अगर परिसरात विनाकारण फिरणार्‍यांवर अशाचप्रकारे कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी सांगितले.

Leave a Comment